Tuesday, July 1, 2025
spot_img
Home Blog Page 26

शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजा

0

शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजादेव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते.देवी त्र्यंबोलीने ( टेंबलाई ) आपल्या चतुराईने कामाक्षा कडील योग दंड काढून घेऊन देवांना पूर्ववत केले व कामाक्षा बरोबर युद्ध करुन त्याचा वध केला. त्या विजया प्रित्यर्थ श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) ने विजय सोहळा आयोजित केला. परंतु या सोहळ्याचे त्र्यंबोली देवीला आमंत्रण द्यायचे राहून गेले.त्यामुळे सखी देवी त्र्यंबोली रुसुन पुर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. महालक्ष्मी ( अंबाबाई ) च्या हे लक्षात आल्यावर ती त्र्यंबोली देवी चा रुसवा काढण्यासाठी आजच्या ललिता पंचमी दिवशी तिला भेटायला गेली व तिचा रुसवा काढून दोघींची हृद्य भेट झाली.आजची आई अंबाबाईची पूजा हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जातानाची आहे.

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती

३० एकरांत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये होणार ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय

माझ्या जिल्ह्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब

कोल्हापूर:प्रतिनिधी : कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांच्या विस्तीर्ण जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १,१०० बेडच्या हॉस्पिटलचे भूमिपूजन आज बुधवार दि. ९ होत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सायंकाळी पाच वाजता शेंडा पार्कमध्ये भूमिपूजन आणि साडेपाच वाजता तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचेही, श्री. मंत्री यांनी सांगितले.मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत आरोग्य संकुल होत आहे. या अद्ययावत आरोग्य संकुलात ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल होणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवलेली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. लवकरच एकूण अकराशे बेडच्या सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक अशा या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वस्तीगृह या पूर्ण झालेल्या पाच इमारतींचे लोकार्पण होणार आहे. तसेच पुढील इमारतींचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.

असे होणार आरोग्य संकुल……

एकूण ३० एकरांत साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी…..
सामान्य रुग्णालय व बाह्यरुग्ण विभाग बेड ६००
कॅन्सर हॉस्पिटल बेड २५०
सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बेड २५०
न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष वस्तीगृह- क्षमता २५०
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वस्तीगृह- क्षमता २५०
मुलींचे वस्तीगृह- क्षमता १५०
मुलांचे वस्तीगृह- क्षमता १५०
परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता १००
सेंट्रल लायब्ररी
परीक्षा भवन- क्षमता ४००
अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण

सर्वोच्च समाधान…...!
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, माझा स्वतःचा जिल्हा असलेल्या कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे याचा मला आनंद, अभिमान आणि समाधान आहे. रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय. या वैद्यकीय नगरीतील १,१०० बेडचे हे अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब. या आरोग्य संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा तर मिळतीलच. परंतु; पुणे -मुंबईसारख्या मोठ्या शहरात होणारे यकृत प्रत्यारोपण, मेंदूच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, कॅन्सर, किडनी, हृदय पोटाचे गंभीर विकार, सांधे रोपण इत्यादी विशेष उपचारही कोल्हापुरातच मिळतील.

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

0

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण

कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

उत्तुर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालय भूमिपूजनासह मौजे सांगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाचेही भूमिपूजन

कागल/प्रतिनिधी : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच, सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचे अनावरण, कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा, उत्तुर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालय भूमिपूजनासह मौजे सांगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाचेही भूमिपूजन होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.रविवार दिनांक ६ रोजी चार वाजता सेनापती कापशी येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
सोमवार दि. ७ रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दुपारी ४ वाजता देशातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय तसेच हॉस्पिटलचा भूमिपूजन, कोनशीला अनावरण उत्तूरमध्ये होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पदवी प्रवेश कार्यक्रम बहिरेवाडी ता. आजरा येथील जे. पी. नाईक हॉलमध्ये होत आहे. तसेच; सायंकाळी ६ वाजता उत्तुर येथील उत्तुर- धामणे रोडवरील एसटी स्टँड बांधकाम व तलाव सुशोभीकरण शुभारंभ व येथील नेहरू चौकात जाहीर सभा होणार आहे.
बुधवार दि. ९ रोजी कोल्हापूर येथील शेंडा पार्कमधील ११०० बेडचे हॉस्पिटल तसेच येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होत आहे. तसेच तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन होणार आहे.गुरुवार दि १० रोजी सायंकाळी ४ वाजता मौजे सांगाव येथील नवोदय विद्यालय शेजारी ग्रामीण सेंटर १०० बेडच्या हॉस्पिटलच्या कामाचा भूमिपूजन, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय शुभारंभ नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती माधुरीताई कानिटकर यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सायंकाळी सात वाजता मौजे सांगाव येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

0

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी संधी दिली जात नाही सरकारी संस्थांच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवली जात आहेत हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्त्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची ५०% ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे. इंडिया आघाडीही मर्यादा हटवेल आणि लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली.
हॉटेल सयाजी येथे राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, आज कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे ठोसपणे सांगता येत नाही. परंतु जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे .जात निहाय जनगणना म्हणजे एक्सराच आहे एक्स-रे काढल्यानंतर समस्या काय आहे ते समजून येईल व नंतर त्यावर उपाय करता येईल पण जात निहाय
जनगणनेला भाजप ,आरएसएसचा विरोध आहे देशातील ९० टक्के जनतेला खरी माहिती कळू नये यासाठी ते विरोध करत आहेत. परंतु लोकांच्या हितासाठी जातनिहाय जनगणना लोकसभा व राज्यसभेत आपण मंजूर करून घेऊ यासाठी कुठलीही शक्ती रोखू शकणार नाही .आम्ही जे बोलतो ते करून दाखवून देतो असेही त्यांनी सांगितले. ज्यांच्या हातात कला कौशल्य अनुभव आहे त्यांना मागे खेचता येणार नाही ही आजची परिस्थिती आहे. यांच्या बद्दल शालेय अभ्यासक्रमात काहीच नाही .दलित मागासवर्गाचा इतिहास शिकवला जात नाही त्यांचा इतिहास पुढे आला पाहिजे .शिक्षण क्षेत्रावर काही विशिष्ट लोकांचा पकडा आहे गरीब घरातील मुलाला डॉक्टर ,वकील ,इंजिनिअर व्हायचे आहे .पण त्यातील काही जणांचे स्वप्न पूर्ण होत आणि बाकीज्यांचे स्वप्न मोडीत निघतील अशा परिस्थितीत आहे. भारत सुपर पॉवर कसा बनेल असा प्रश्नही त्यांनी विचारला यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले की, आरक्षणा शिवाय समाजाची प्रगती होणार नाही.
१९०२ साली शाहू महाराजांनी समान हक्क मिळावा यासाठी आरक्षण लागू केले. राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घनिष्ठ संबंध होते. शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हक्क देऊन देशभर लागू केले. आज हे संविधान मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. खासदार राहुल गांधी हे संविधान रक्षक आहेत तसेच आपणही देशाची संविधान अबाधित राहावे ; यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी शाहू महाराजांच्या समाधी स्थळात भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

0

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात सजली आहे.
रावण वधानंतर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला त्याप्रसंगी सकल चराचराला आमंत्रण होते परंतु आपल्यामुळेच रावण वध होऊ शकला तरी सुद्धा आपल्याला आमंत्रण मिळाले नाही याचा राग धरत सेतू मूर्तिमंत रूप घेऊन रामरायाच्या दरबारात आला. त्याने आपला क्रोध बोलून दाखवला व सीतेसारखी सुंदरी मिळाली म्हणून तु मला विसरलास असे उद्गार काढले हे ऐकून सीतामाई रागावल्या आणि त्यांनी सेतूला शाप दिला की पुढे तुझा वध जगदंबेच्या हातून होईल कालांतराने भगवान रामचंद्र नारायणमुनी तर सीता चंद्र वदना या नावाने अंशात्मक अवतार धारण करते झाले. कारण इंद्र आणि तक्षक राजाची कन्या यांचा पुत्र म्हणून सेतुराजा अवतीर्ण झाला होता. सेतू राजाने मला कोणाकडूनही मरण येऊ नये असे वरदान मिळवल्या नंतर तो मदोन्मत्त झाला समस्त चराचराला त्रास देऊ लागला तेव्हा याचा वध होऊ दे असा विचार करून देवांनी नारायण मुनी व त्यांची पत्नी चंद्रवदना हे जेथे तप करत होते त्या परिसरामध्ये राजाला येण्यास भाग पाडले चंद्रवदनेला बघून भाळलेल्या सेतू राजाने तिचे अपहरण केले तेव्हा मला दोन महिन्याचे व्रत आहेत ते पूर्ण झाले की मी तुझ्याशी विवाह करीन असं खोटं सांगून चंद्रवदना त्याच्या कैदेमध्ये राहीली. तिकडे नारायण मुनींनी पत्नीचा शोध करताच ती सापडत नाही म्हटल्यावर श्रीशैल पर्वतावर जाऊन भ्रमरांबिकेचे अनुष्ठान केले. हिंगुलाज भगवती भ्रमरांबिका नारायणावर प्रसन्न झाली व तीने आपल्या उजव्या पायातून शैव शाक्त वैष्णव आणि डाव्या पायातून नादक व बैंदक असे पाच भ्रमर म्हणजे भुंगे प्रगट केले आणि सांगितले की हेच भ्रमर सेतु राजाचा नाश करतील देवीने दिलेल्या माणिक पात्रामध्ये पाची भ्रमरांना य घेऊन नारायण मुनी सन्नतीकडे निघाले देवीने सांगितल्याप्रमाणे तिच्या घोषाचा आवाज त्यांच्या कानावर येत होता पण अचानक हानगुंठ क्षेत्री आल्यावर तो आवाज येईना म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले तर तिथे जगदंबा स्थिर झाली पुढे नारायण मुनींनी सन्नतीत जाऊन सेतू राजाला आपल्या येण्याचा हेतू सांगितला राजा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी पाची भ्रमरांना मुक्त केले त्या भ्रमरांनी असंख्य रूपं घेऊन राजाचा नाश केला व पुन्हा देवीच्या पादुकांमध्ये ते भ्रमर गुप्त झाले नारायण मुनींनी त्या ठिकाणी देवीची उपासना केली देवीने दिलेल्या वरदान प्रमाणे च्या नावाने देवी चंद्रला म्हणून प्रसिद्ध झाली आज गुलबर्गा जिल्ह्यातील सन्नती गावी देवीचे मंदिर आहे. अनेक घराण्याची ती कुलस्वामिनी आहे अशा वैशिष्ट्यपूर्ण चंद्रला परमेश्वरी या रुपात आज करवीर निवासिनी सजली आहे.

ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे – विरोधी पक्षनेते राहुल गांधी

0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात अनावरण

ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे – विरोधी पक्षनेते राहुल गांधी

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं विरोध केला. त्याच विचारधारे विरोधात आपण आता लढत आहोत. आपली लढाई त्या विचारधारेशी असून “शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला आहे. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला,” असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी कोल्हापुरात केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळ्याचे अनावरण आज कसबा बावडा भगवा चौक येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. हा भव्य पुतळा शौर्य, न्याय आणि स्वाभिमान या तत्वांची आपल्या सर्वांना कायमस्वरूपी प्रेरणा देत राहणार आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजारो वर्षापूर्वी राज्याभिषेक केला. मात्र या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. मात्र तो पुतळा काही दिवसातच कोसळला. कारण यांची विचारधाराच चुकीची आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला,” असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
यावेळी राहुल गांधीं म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या काळात पुढे घेऊन जाणे म्हणजे संविधानासोबत उभे राहणे आणि सर्वसमावेशक न्यायासाठी प्रयत्न करणे” अशी भूमिका मांडली. ही भूमिका समस्त महाराष्ट्राला दिशा देणारी आहे.
याप्रसंगी शाहू छत्रपती महाराज, रमेश चेन्निथला , नाना पटोले , बाळासाहेब थोरात , विजय वडेट्टीवार , सुशीलकुमार शिंदे , पृथ्वीराज चव्हाण , डॉ. संजय डी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, रजनीताई पाटील, खा. प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, नसीम खान, विश्र्वजीत कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राहुल पाटील , बाळासाहेब सरनाईक, विलास दादा पवार , यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सभापती, उपसभापती, आदी मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते. असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा आजचा प्रेरणादायी सोहळा समस्त कोल्हापुरकरांच्या कायम स्मरणात राहील असे शिवमय वातावरणात होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुतळा समितीचे सदस्य, कसबा बावडा, लाइन बाजार वासीय, सर्व तरुण मंडळे यांनी मनापासून सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन व आभार आमदार सतेज पाटील यांनी मानले.

आई अंबाबाई नवरात्र उत्सव, साक्षात शक्ती देवता

0

आई अंबाबाई नवरात्र उत्सव, साक्षात शक्ती देवता

 

कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : करवीर निवासिनी आई अंबाबाईचा नवरात्रोत्सव म्हणजे करवीर काशीचा उत्सव ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने अंबाबाई मंदिर बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे.                                          आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मुर्ती आढळून येतात.पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स. ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात ​’लिंगशैषाघौषहारिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हणले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे. नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात.                 हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात किरणोत्सव होतो. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.  शक्तीची उपासना माणसाला बळ देणारी, प्रेरणा देणारी ठरते. नवरात्र उत्सव ही याठिकाणी पार पडतो लाखो भाविक मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात.देवीचा जागर ही घातला जातो देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे, सुंदर प्रतिमांचे दर्शन या निमित्ताने घडते. महाराष्ट्रात अशाच वेगवेगळ्या रूपांमध्ये देवीची उपासना केली जाते. कोल्हापूर, माहूर, तुळजापूर सोबतच गावोगावी मातृ दैवतांची आराधना करण्याचा परंपरा आहे. स्थान महात्म्याच्या दृष्टीने साडेतीन शक्तीपीठे अतिशय महत्त्वाची आहेत. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, माहूरची श्री रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी ही तीन; तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तीपीठ आहे, असे मानले जाते.पौराणिक कथेनुसार राजा दक्षाच्या यज्ञात देवी सतीने आत्मसमर्पण केले. त्यानंतर भगवान शिव तिचे शव हातात घेऊन विमनस्क अवस्थेत तिन्ही लोकी संचार करत होते. तेव्हा सर्व देवांच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या कलेवराचे तुकडे केले. पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तिथे शक्तिपीठांची निर्मिती झाली.शक्ती पूजेच्या मुख्य केंद्रांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे, करवीरनिवासिनी महालक्ष्मी. कोल्हापूर किंवा करवीर हे प्राचीन काळापासून पवित्र ठिकाण मानले गेले आहे. करवीर आणि महालक्ष्मी देवी यांचा राष्ट्रकुट काळातल्या ताम्रपटामध्ये उल्लेख सापडतो. त्यानंतरच्या अनेक राजवंशांनी करवीरनिवासिनी महालक्ष्मीची आराधना केल्याचे उल्लेख सापडतात. मराठी राजसत्तेच्या काळात या देवस्थानला वैभव प्राप्त झाले.’आई अंबाबाई ‘म्हणून कोल्हापूरची देवी भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. करवीर महात्म्यच्या रचनाकारांनी म्हटले आहे, करवीर नगर हे शक्तीच्या आगमनामुळे ‘शक्तीयुक्त’ झाले आहे. मनुष्यांना भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्रदान करणारे हे करवीर क्षेत्र वाराणसीहून अधिक श्रेष्ठ आहे.

आश्वीन शुद्ध नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गजेंद्रलक्ष्मी रुपात आई अंबाबाईची पूजा

0

आश्वीन शुद्ध नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गजेंद्रलक्ष्मी रुपात आई अंबाबाईची पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आश्वीन शुद्ध नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गजेंद्रलक्ष्मी रुपात आई अंबाबाईची पूजा बांधण्यात आली होती. आज दुसऱ्या दिवशी अंबाबाई मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सकल सौभाग्य कारिव्य, श्री गजलक्ष्मै नमः ।। गजलक्ष्मी नमस्तेऽस्मू सर्वदेव स्वरूपिणी। अश्वांश्च गोकुल देही सर्व कामांश्च देही मे ॥देव व असूर यांच्या समुद्रमंधनातून जी ९४ रत्ने निघाली त्यात पहिली लक्ष्मी निघाली. हिला कमला लक्ष्मी पण म्हणतात. हिला गजेंद्र लक्ष्मी अथव। गजलक्ष्मी म्हणण्याचे कारण की ही जेव्हा समुद्रमंथनातून उत्पन्न झाली तेव्हा तीला हत्तीनी अमृत कुभाने अभिषेक केला. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्व साभाग्य देणारी देवता अहि हिच्या उपासनेने गजात धन व समृद्धी लाभते. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतिक म्हणून या देवीची उपासना करतात.अशी ही पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्रीपूक श्री विद्याधर मुनिश्वर, श्री अरुण मुनिश्वर, ती मयुर मुकुंद मुनिश्वर यांनी बांधली.

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी उद्या शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

0

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी उद्या शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

कसबा बावड्यात छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती आमदार सतेज पाटील यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार ४ ऑक्टोबर व शनिवार ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राहुल गांधी हे ४ व ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
५ ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
खासदार राहूल गांधी यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल. ४ ऑक्टोबर सायं.५.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाकडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : कोल्हापूर विमानतळ – शाहू नाका – शिवाजी विद्यापीठ – कावळा नाका – धैर्यप्रसाद चौक – एस.पी. ऑफीस चौक – भगवा चौक, कसबा बावडा, सायं.६ वाजता – कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम, ५ ऑक्टोबर दु.१ वाजता – हॉटेल सयाजी येथून राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : हॉटेल सयाजी – कावळा नाका – दाभोळकर कॉर्नर – व्हिनस कॉर्नर – दसरा चौक – राजर्षि छत्रपती
शाहू महाराज समाधी स्थळ, दु.१.३० वाजता – राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर , सायं.४ वाजता – हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सभा खेळीमेळीत

0

कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सभा खेळीमेळीत

कोल्हापूर/प्रतिनिधी : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.येथील वाय. पी. पोवारनगरमधील उद्यम सांस्कृतिक सभागृहात कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सोसायटीची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी आमदार जाधव अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.आमदार जाधव म्हणाल्या, कोल्हापूरचा औद्योगिक विकास झाला पाहिजे आणि येथील उद्योजक सक्षम बनला पाहिजे या उद्देशाने कोल्हापूर उद्यम सोसायटी काम करीत आहे. लघु उद्योजक सभासदांना औद्योगिक कारणासाठी जागा पुरविणे, लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन देणे हा उद्यम सोसायटीचा मुख्य हेतू आहे. यानुसारच टोप संभापूर येथे सोसायटीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. येथील विजेचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून, वीज वितरण कंपनीकडून औद्योगिक वसाहतीमध्ये सबस्टेशन उभारणीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधी मंजुर करून आणला. या निधीतून सबस्टेशनच्या बांधकामास सुरुवात झाले. हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होणार आहे. याचबरोबर इंटरनल लाईट पोल उभारणे, ट्रान्सफॉर्मर बसवणे या कामाचे इस्टिमेट व ड्रॉइंगचे काम पूर्ण झाले असून, या कामाची टेंडर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक वसाहत मधील कच्चे रस्ते आणि घुणकी ते संभापूर येथील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. संभापूर येथील पाण्याची टाकी व जल शुध्दीकरण केंद्राचे काम हे पूर्ण झाले आहे. यामुळे या ठिकाणी जागा घेतलेल्या सभासदांनी उद्योग उभारणीच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी.सस्थेने औद्योगिक मंदी असतानाही चांगले काम केले आहे. सभासद, फौंड्री उद्योजकांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे चांगले काम करता आले असे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विषय पत्रिकेमधील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राजन सातपुते, संचालक हिंदुराव कामते, संगीता नलवडे, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, संजय अंगडी, अशोक जाधव, माणिक सातवेकर, भरत जाधव, सुधाकर सुतार, कुशल सामाणी यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद व उद्योजक कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष राजन सातपुते यांनी आभार मानले.