Monday, June 30, 2025
spot_img
Homeदेशदोन चोरट्याकडून ४१५ मिटर इलेक्ट्रिक केबल व ०१ मोटर असा एकुण १,३३,७५०/-...

दोन चोरट्याकडून ४१५ मिटर इलेक्ट्रिक केबल व ०१ मोटर असा एकुण १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

दोन चोरट्याकडून ४१५ मिटर इलेक्ट्रिक केबल व ०१ मोटर असा एकुण १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

कोल्हापूर/प्रतिनिधी : मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या इलेक्ट्रीक मोटरी व मोटरची केवल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून इलेक्ट्रीक मोटरी व मोटरची केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.त्यानुसार कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत इलेक्ट्रीक मोटरी व मोटरची केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सतिश जंगम यांना गोपनीय खात्रीशिर माहिती मिळाली की, गडहिंग्लज पोलीस ठाणे गु.र.नं. २९९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हा हा विश्वनाथ हुदली व त्याचा साथीदार यांनी केला आहे. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथक दिनांक २८/०६/२०२५ रोजी नमुद आरोपींचा तेरणी, ता. गंडहिंग्लज येथे शोध घेत असताना आरोपी १) विश्वनाथ इराप्पा हुदली व.व. ३१, रा. बुगडीक‌ट्टी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, २) कन्याप्पा फकीरअप्पा उदनायक व.व. २८, रा. तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, मुळ गाव सुनकुंपी, ता. बैलहोंगल, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक हे तेरणी ते बुगडीक‌ट्टी जाणारे रोडवर तेरणी, ता. गडहिंग्लज येथे गावचे हद्दीत दुंडवा भिमा भोई यांचे मालकीचे पत्र्याच्या शेडचे दारात मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून तेथील पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेली चोरीच्या गुन्ह्यातील केबल काढून दिली आहे. तसेच सदर शेडची तपासणी केली असता सदर शेडमध्ये आणखी केवली व एक मोटर मिळून आल्याने त्याबाबत विश्वनाथ इराप्पा हुदली याच्याकडे तपास केला असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास अधिक विश्वासात तपास केला असता त्याने, मोटर व केवल ह्या स्वतः गडहिंग्लज येथील वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरल्या असल्याचे सांगितले. आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील ४१५ मिटर इलेक्ट्रिक केबल व ०१ इलेक्ट्रीक मोटर असा एकुण १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गडहिंग्लज पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून उघडकीस आले गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर
कलम ०१ गडहिंग्लज,६४/२०२५
भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे ०२
गडहिंग्लज,१५०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे, गडहिंग्लज, १६०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गडहिंग्लज २५५/२०२५
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे,
गडहिंग्लज २९९/२०२५
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे आहेत.आरोपी विश्वनाथ इराप्पा हुबली याचेवर कर्नाटक राज्यात कॉपर चोरीचे एकूण ७९ गुन्हे आहेत.ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. योगेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार सतिश जंगम, दिपक घोरपडे, प्रविण पाटील, रोहीत मर्दाने, समीर कांबळे, अमित सर्जे, राजु कांबळे, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, हंबीरराव अतिग्रे, अमित मर्दाने यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments