प्रोफेसर उद्धव भोसले घोडावत विद्यापीठाचे नवे कुलगुरू
प्रोफेसर उद्धव भोसले यांची संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड
जयसिंगपूर/प्रतिनिधी :स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांची संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड करण्यात आली.त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले,कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी त्यांचे स्वागत केले.प्रोफेसर भोसले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बी.ई तसेच एम.इ केले असून आयआयटी मुंबई येथून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या विषयात पीएचडी मिळवली आहे.
या अगोदर भोसले यांनी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नवी मुंबई येथे प्राचार्य पदी काम केले आहे.तसेच एमजीएम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मुंबई येथे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे.त्यांना अध्यापन,संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.