Thursday, June 26, 2025
spot_img
Homeताज्यासंजय घोडावत स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घघाटन सोहळा संपन्न

संजय घोडावत स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घघाटन सोहळा संपन्न

संजय घोडावत स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घघाटन सोहळा संपन्न

अतिग्रे/,प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा दि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वा. उद्घघाटन समारंभ यशस्वी पार पडला सीबीएससीचे पुणे विभाग प्रमुख श्री राम वीर, विभागीय क्रीडा संचालक श्री माणिक वाघमारे, एशियन अंडर २० ॲथलेटिक चॅम्पियन रिया नितीन पाटील, सीबीएसई निरीक्षक श्री प्रमोद पाटील, सीबीएसई टेक्निकल ऑफिसर श्री बाहुबली चौगुला, क्रीडा संचालक के एल ई युनिव्हर्सिटी डॉ गुरुराज पुराणिक, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, सहोदया कॉम्प्लेक्स कोल्हापूरचे सर्व प्रिन्सिपल यांच्या उपस्थित पार पडला. सलग ९ व्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला मिळाला आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमन येथील १५० पेक्षा अधिक सीबीएसई शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत. १५०० पेक्षा अधिक खेळाडू १४ १७ व १९ या वयोगटातील विविध ॲथलेटिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तीन दिवस या स्पर्धा संजय घोडावत स्कूलच्या मैदानावर चालणार आहेत.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री राम वीर म्हणाले, स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. सहभागी खेळाडूंनी आपल्यामधील कौशल्य व मेहनत यांच्या जोरावर यश प्राप्त करावे. खेळाकडे एक करियर म्हणून पहावे. खेळातून आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करावा. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल व खेळाडूंच्या सुविधांबद्दल श्री राम वीर यांनी चेअरमन श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले व संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्याने प्रमुख अतिथींचे औक्षण करून स्वागत केले. तसेच स्वागतगीत व महाराष्ट्र लोकनृत्य सादर केले. त्यानंतर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना मानवंदना देत संचलन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन करण्यात आले. अतिथींनी क्रीडाध्वज फडकवून विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देऊन खेळाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, उपप्राचार्य श्री अस्कर अली, उपप्राचार्य अर्चना पाटील उपप्राचार्य शोभा नवीन सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी रिमझिम जैन, अदिती पाटील व विद्यार्थी अर्णव नायकु, रायन मोमीन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments