पाचगावमधील पाटील कुटुंबियांनी केले इराचे हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत
कोल्हापूर/प्रतिनिधी : घरी मुलगी जन्माला आले की काहीसा नाराजीचा सुर असतो..मात्र कोल्हापुरातील पाचगाव मधल्या पाटील कुटुंबीयांनी एक आगळ वेगळा आदर्श घालून दिला आहे. पाचगाव मधील शांतीनगर मध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी घरी जन्माला आलेल्या इरा या मुलीची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत केले.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले गिरीश पाटील आणि मनीषा पाटील यांना लग्नाच्या तब्बल आठ वर्षानंतर मुलगी झाली आहे.त्या आनंदात पाटील कुटुंबीयांनी आज ईराच हत्तीवरून मिरवणूक काढत तसेच ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. इतकंच नाही तर यावेळी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश या निमित्ताने पाटील कुटुंबीयांनी दिला आहे. तर एरवी मुलगी झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली जाते. मात्र गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीचे केलेले स्वागत पाहून आई मनीषा पाटील ही भारावून गेल्या.मुलीचे हत्ती वरून मिरवणूक काढून सासरच्या मंडळींनी केलेल्या स्वागतामुळे प्रत्येक मुलीला सासरची मंडळी आपलीशी वाटतील असाच आदर्श या गिरीष पाटील यांच्या घरच्या मंडळींनी दाखवून दिला आहे.अशा या विधायक विचारामुळे समाजात एक नवा विचार हा पुढे येणार आहे.