Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याडेक्कन् स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर व ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे...

डेक्कन् स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर व ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांच्या वतीने बर्गमॅन ट्रायथलॉन या स्पर्धाचे आयोजन

डेक्कन् स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर व ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांच्या वतीने बर्गमॅन ट्रायथलॉन या स्पर्धाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य व मनमोहक अशा भीमाशंकर परिसरात असणाऱ्या ‘डिंभे धरण’ परिसर आंबेगाव , पुणे येथे डेक्कन् स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर व ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बर्गमॅन ट्रायथलॉन या स्पर्धाचे आयोजन केलेआहे.ही प्रतिष्ठाप्राप्त ‘बर्गमॅन ट्रायथलॉन’ दोन प्रकारांत विभागली आहे. ‘बर्गमॅन १३३’ या प्रकारात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग करणे आणि २१.१ किमी धावणे तसेच, ‘बर्गमॅन ऑलिम्पिक’ या प्रकारात १.५ किमी पोहणे, ४० किमी सायकलिंग करणे आणि १० किमी धावणे समाविष्ट केले आहे.
बर्गमॅन ट्रायथलॉन’ ही भारतातील एक प्रतिष्ठित ट्रायथलॉन मानली जाते, ज्यात देशाच्या कानकोपऱ्यातून स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. स्पर्धकांना व प्रेक्षकांना अत्यंत चित्तथराराक आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे
ही ट्रायथलॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना ‘बर्गमन’ ही प्रतिष्ठाप्राप्त किताब बहाल केला जातो. हा किताब त्यांच्या सामर्थ्य आणि लवचिकतेचे प्रतीक असते. ‘बर्गमन’ म्हणजे ‘पहाडी पुरुष , जो सर्वाथाने मजबूत आणि दृढनिश्चयी असतो.
ट्रायथलॉन हा शारीरिक क्षमतेचा कस लावणारा क्रीडा प्रकार असून धावणे,पोहणे व सायकलिंग करणे म्हणजे शरीरासाठी शरीराला ऊर्जा देणारे असेच आहे.त्यासोबतच सहयोगी पार्टनर म्हणून ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’चा या ट्रायथलॉनमधील सहभाग महत्त्वपूर्ण तसेच स्पर्धेची शोभा वाढवणारा आहे.
या बर्गमन ट्रायथलॉनचा उद्देश, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करत खेळाडूंना त्यांच्या मर्यादा ओलांडण्यास आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहित करणे हा असून या स्पर्धेत भारतभरातील ५०० हून अधिक खेळाडू सहभागी होत असल्याने ही स्पर्धा अतीतटीची व चुरशीची होणार आहे.एक उत्तम आयोजक या नात्याने डेक्कन स्पोर्ट्स क्लब ही बर्गमन ट्रायथलॉन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व खेळाडूंना अतुलनीय अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

स्पर्धेमधील वयोगट असे आहेत

या स्पर्धा १६ वर्षांपासून ३० व ३१ ते ४० व ४१ ते ५० आणि ५१ वर्षा पुढील सर्वांसाठी आहे.‘

जवळजवळ ५०० स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गुडी बॅग,टी. शर्ट, फीनीशर मेडल,टाईम चिप ई – सर्टिफिकेट नाश्ता ,मेडिकल तसेच फीजिओ सपोर्ट दिला जाणार आहे.या स्पर्धेसाठी एकूण १५० व्हॅालेंटीयर्स स्पर्धा मार्गावर कार्यरत असणार आहेत.ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांच्या वतीने माजी आमदार श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या मार्गदर्शना खाली डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे ,उदय पाटील,वैभव बेळगावकर,समीर चौगुले मनीष सूर्यवंशी आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments