Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याईडीची आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल,पुणे घरावर छापा, कागल बंदची हाक

ईडीची आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल,पुणे घरावर छापा, कागल बंदची हाक

ईडीची आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल,पुणे घरावर छापा, कागल बंदची हाक

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल व पुणे येथील घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आज बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी यांनी मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त समजताच समर्थक व कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीने धाड टाकली आहे. कागल मधील
एके ४७ घेऊन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड टाकली आहे.घरी जाणा-या कार्यकर्त्यांना आडवून दमदाटी केली जात आहे.संतप्त कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध हा केला आहे.
आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे.भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.मात्र मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. बुधवारी सकाळी ईडी व आयकरच्या पथकाने घरावर छापा टाकला. या पथकात ४७ हुन अधिक अधिकाऱ्यांचा सहभाग असल्यास माहिती आहे. माजी मंत्री मुश्रीफ हे सध्या मुंबई येथे आहेत. दरम्यान मुश्रीफ त्यांच्या समर्थकांनी सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जून २०१९ मध्ये इन्कम टॅक्स खात्याने छापा टाकण्यात आला होता. दरम्यान मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर टाकण्यात आलेल्या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे मुश्रीफ यांच्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कागल बंदची हाक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments