मा.राज ठाकरे यांचा २९ व ३० नोव्हेंबरला कोल्हापूर दौरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदुजननायक मा. राज ठाकरे यांच्या २९ व ३० नोव्हेंबर २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात राज ठाकरे हे २९ रोजी कोल्हापूर मध्ये व ३० रोजी कोकण दौऱ्यावर येत आहे अशी माहिती शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले प्रसाद पाटील,विजय करजगार, जेष्ठ नेत पुंडलिक जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज ठाकरे मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी तावडे हॉटेल मार्ग शहरात पदार्पण करताच दु. १.००वा ताराराणी चौक येथे भव्यदिव्य स्वागत करणेत येणार आहे.
परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी बुधवार दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी चे नियोजन सांगताना स. ९.०० वाजता प्रथम राजर्षि शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेतील.
तद्नंतर सकाळी ९.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. सकाळी ९.३० वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन कोकण दौऱ्यासाठी रवाना होतील.
ज्येष्ठ नेते पुंडलीकभाऊ जाधव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन प्रचंड उत्साहात राज ठाकरेंचे स्वागत करण्याचा मनोदय व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष राजू दिंडोले, जेष्ठ नेत पुंडलिक जाधव, जिल्हासचिव प्रसाद पाटील, परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार, सहकारसेना संघटक निलेश लाड, जनहित संघटक रत्नदिप चोपडे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.