‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ सिनेमातील रावडी लूकमधील विराट मडके पोस्टर रिलीज.
हातात बंदूक आणि डोळ्यात सूड भावना या अभिनेत्याचा हा लूक थक्क करणार आहे. आत्तापर्यंत आपण या अभिनेत्याला आव्हानात्मक भूमिकेत पाहिलं आहे. हा अभिनेता आहे विराट मडके. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टीचा सर्वात मोठा सिनेमा ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाची उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचे तीन पोस्टर्स आत्तापर्यंत समोर आले आहेत आणि प्रत्येक पोस्टरमधून कलाकारांचे चॅलेंजिंग लूक समोर आले आहेत आणि आता विराट मडकेचाही हा लूक प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता निर्माण करेल. विराट मडकेचा आज वाढदिवस त्या निमित्त त्याचे पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित केले. ‘ केसरी’ सिनेमातून पदार्पण केल्यानंतर विराटने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याचा सोयरीक हा सिनेमा रिलीज झाला होता. त्या शिवाय विराट वीर दौडले सात या सिनेमातही भूमिका करतो आहे. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या सिनेमातील लूक बद्दल विराट सांगतो, ‘’माझ्यासाठी हा सिनेमा सर्वच बाजूंनी आव्हानात्मक होता. ही भूमिका साकारण्यासाठी पूर्ण अभ्यास मी केला होता. त्याचप्रमाणे फिजीकलीही हा सिनेमा बराच कष्टदायी होता. कारण जंगलात, डोंगराळ भागात याचे शूट झाले आहे. या लूकमागे सर्व टीमची मेहनत आहे. पोस्टरमध्ये दाखवल्या प्रमाणे रावडी असा लूक दिसत आहे आणि सिनेमा पाहिल्यावरच याचा उलगडा होईल. ‘’निर्माते दीपक पांडुरंग राणे आणि विजय शेट्टी आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा घेऊन येत आहेत. हा सिनेमा मराठी आणि कन्नडा या दोन भाषेत शूट झाला आहे. या बद्दल बोलताना विराट म्हणतो, ‘’कर्नाटकमध्ये शूट करणं, तिथली संस्कृती जाणू घेणं ,तिथली भाषा समजणं हाही खूपच छान अनुभव होता. सिनेमा दोन भाषेत शूट झाला त्यामुळे कन्नडा भाषा मी थोड्याफार प्रमाणात शिकलो.’’ आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी – कन्नडा सह हिंदी, तेलगु, तमिळ, मल्याळममध्येही प्रदर्शित होणार आहे. दिपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या पॅन इंडिया सिनेमात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी , शिवानी सुर्वे यांच्याही भूमिका आहेत. २०२३ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.