Wednesday, January 15, 2025
Home ताज्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आई अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या...

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आई अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आई अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज दिनांक २७ सप्टेंबर २०२२ शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात पूजा ही बांधण्यात आली होती.
दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे.त्यावेळेला पुढे दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल. असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे. या स्वरूपात भगवती अष्टभुजा धारण करून देवी सिंहावरती विराजमान आहे.हातामध्ये शंख चक्र खड्ग धनुष्य बाण वरद कमळ त्रिशुळ तलवार आदी आयुधं धारण करीत असते.
दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी या रूपाचा बोध होतो. आजच्या द्वितीया तिथीला जगदंबेचे हे देवी कवचात वर्णन केलेल्या नवदुर्गांनी युक्त अष्टभुजा स्वरूप साकारले आहे.अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments