Thursday, June 26, 2025
spot_img
Homeताज्यामहानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी पाणीपुरवठा व प्राथमिक शिक्षण मंडळ या कडील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती करणे माननीय महानगरपालिका सभागृहाची ची मान्यता झाली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यास राज्य शासनाची ची मान्यता होऊन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२० या दिनांकापासून सातव्या वेतन आयोगाची ची अंमलबजावणी करण्याचे आदेश महानगरपालिकेस आज प्राप्त झाले असे संजय भोसले अध्यक्ष महानगरपालिका कर्मचारी संघ यांनी सांगितले.
याकामी कर्मचारी संघाने शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला असून, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी व विशेषतः राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व मा. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. महानगरपालिका कर्मचारी संघ महानगरपालिका सर्व पदाधिकारी नगरसेवक अधिकारी आणि जिल्ह्यातील दोन्ही मंत्री महोदयांचे आभारी आहे असे संजय भोसले यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments