शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा पाचवा दिवस आज पाचव्या दिवशी देवी अंबाबाईची पंचमीला ‘गजारूढ’ रुपात पूजा बांधण्यात आली होती.
तिथी अश्विन शुद्ध पंचमी अर्थात ललिता पंचमी आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आपली प्रिय पात्र सखी त्र्यंबुली तिला भेटण्यासाठी शहराच्या बाहेर असणाऱ्या तिच्या टेकडीवरील मंदिराकडे प्रस्थान ठेवते कोणे एके काळी कामाक्ष नावाच्या दैत्याने महालक्ष्मी सहज सर्व देवतांना शेळी मेंढ्या मध्ये रूपांतरित केले होते. त्यावेळी महालक्ष्मीची दासी व पूर्वजन्मीची कौंडिण्य नावाच्या ऋषीची शापित पत्नी असणाऱ्या बाल कुमारिका त्र्यंबोली ने कामाक्षा चा योगदंड हिरावून घेऊन वध केला होता त्यानंतर करवीर निवासिनी आपल्या मूळ रूपात येऊन कुष्माण्ड भेदना चा सोहळा करण्यासाठी मंदिरात आली तेव्हा तिच्या लक्षात आले की त्र्यंबोली ला आपण विसरलो तेव्हा त्र्यंबोली ची समजूत घालायला करवीर निवासिनी लवाजम्यासह त्र्यंबोलीच्या टेकडीवर गेली तिथे त्र्यंबोली भेट घेऊन तिचा रुसवा काढला आणि तिला वर दिला की कुष्माण्ड भेदना चा जो सोहळा मी मुक्ती मंडपात करते तो आज पासून तुझ्या दारात होईल मी दरवर्षी तुझ्या भेटीला येऊन हा सोहळा पार पडेल देवीच्या या वचनाला अनुसरून आजही करवीर निवासिनी त्र्यंबोलीच्या भेटीला गेली याचं प्रतीक म्हणून गाभार्यात देवीची गजारूढ म्हणजे हत्तीवर बसलेल्या रुपात पूजा बांधली जाते.
कोल्हासूर वधाची स्मृती म्हणून करवीर निवासिनी आजही कुष्माण्ड भेदनाच्या सोहळ्यासाठी त्र्यंबोली भेटीला जाते तो हा आजचा दिवस.आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवी अंबाबाईची पालखी ही वाहनातून टेकडीवर जाऊन हा कोहळा फोडण्याचा सोहळा पार पडला.