Thursday, December 26, 2024
Home ताज्या आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत - संचालिका श्रीमती...

आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत – संचालिका श्रीमती अंजना रेडेकर

आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत – संचालिका श्रीमती अंजना रेडेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी :“दूध उत्पादक शेतकरी सभासदांनी मोठया विश्वासाने गोकुळची सूत्रे सत्ताधारी आघाडीकडे सोपविली आहेत.गोकुळमधील सत्ताबदलानंतरच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. गेल्या  पंधरा महिन्याच्या कालावधीत  संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात ६ रुपये व गाय दूध खरेदी दरात ४ रुपये  विक्रमी अशी वाढ केली आहे. दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून कारभार सुरू आहे. आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत’असा प्रतिटोला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा संचालिका श्रीमती अंजना रेडेकर  यांनी लगाविला.
संचालिका रेडेकर म्हणाल्‍या, शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या वार्षिक सभेच्या ठिकाणावरुन सत्ताधारी आघाडीवर केलेली टीका निरर्थक आहे. महासैनिक दरबार हॉल येथे पहिल्यांदा गोकुळची सर्वसाधारण सभा होत नाही.यापूर्वीही २६ सप्टेंबर २०१४ रोजी संघाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासैनिक दरबार हॉल येथे झाली आहे. शिवाय २९ सप्टेंबर २०१३ रोजी ही ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व दि.०४ मार्च २०१३ इ.रोजी विशेष सर्वसाधारण सभा शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आली होती. पूर्वी नोव्हेंबर मध्ये  सहकारी संस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होत होत्या पण ९७  व्या घटना दुरुस्ती सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या ३० सप्टेंबर पूर्वी घेण्यास कायद्यानुसार बंधनकारक आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून खुल्या जागेत सभा घेतली असता सभासदांची गैरसोय होऊ शकते या कारणास्तव संघाच्या ताराबाई पार्क ऑफिस पासून जवळच असलेल्या बंदिस्त व पुरेशी बैठक व्यवस्था असलेला  महासैनिक दरबार हॉल येथे सभेचे ठिकाण निवडण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती आहे.
आमचा कारभार चोख आहे.महाडिक यांची टीका खोडून काढताना संचालिका श्रीमती रेडकर  पुढे म्हणतात,‘कसबा बावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण आहे.गोकुळचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा आहे.सभासदांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून सभेचे ठिकाण निश्चित केले आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या ठिकाणी अपरिहार्य कारणास्तव सभा इतर ठिकाणी घेण्यात आल्याची उदाहरणे आहेत. शिवाय महासैनिक दरबार हॉल हे काही खासगी मालमत्ता नाही. तर हे ठिकाण जिल्हा माजी सैनिक कार्यालय कोल्हापूर यांचे आहे.’
संचालिका श्रीमती रेडेकर म्हणाल्‍या,“दूध उत्पादक आणि दूध संघ यांचे नाते फार घट्ट आहे.दूध संघाचे संचालक,अधिकारी,कर्मचारी व इतर माध्यमातून दूध उत्पादक संघाच्या कायम संपर्कात असतात.संघाच्या विविध विभागात दूध उत्पादक हे वेळोवेळी सूचना करत असतात व सूचनाचे निरसन करून घेत असतात.
संघाची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय शांतपणे व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभासदच पार पडतील यात शंका नाही. मुळात गोकुळचा सभासद हा चाणाक्ष आहे. तो कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. सभासद हा गोकुळचे हित जाणतो.म्हणून तर आज गोकुळ यशोशिखरावर आहे.याचे श्रेय गोकुळच्या लाखो दूध उत्पादकांना आहे.’असेही श्रीमती रेडेकर यांनी म्हटले आहे.
संचालिका श्रीमती अंजना रेडेकर म्हणाल्‍या,“शौमिका महाडिक या संघाच्या संचालिका आहेत,त्यांनी टिका करण्यापेक्षा संघांनी घेतलेले सभासदाभिमुख निर्णय माहित करुन घ्यावेत.दूध उत्पादक शेतकरी हे गोकुळचे मालक आहेत.आम्ही सर्व संचालक विश्वस्त आहोत. सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मा.चेअरमनसो व संचालक सक्षम आहेत.राजकारण करत असताना संस्थेचे नाव खराब होणार नाही, सभासदांमध्ये गैरसमज होणार नाहीत इतकी तरी दक्षता महाडिक यांनी घ्यावी.
चौकट- तुम्ही राजाराम साखर कारखान्याची सभा शिरोलीच्या गँरेजमध्ये घेतली, त्यावेळी कोणाचा दबाव होता.?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments