रननिती तर्फे जोतिबा दख्खन हिल हाफ मॅरेथॉन उत्साहात पार
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या जोतिबा दख्खन हील हाफ मॅरेथॉन मध्ये देशातील एकमेव टेम्पल मॅरेथॉन स्पर्धेत देशाच्या विविध भागातून मोठ्या उत्साहाने या स्पर्धत सहभाग नोंदविला. २१.१ किमी, १५ किमी, १० किमी आणि ५ किमी या प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये लहान मुले, तरुण, तरुणी, पुरुष, महिला आणि वयस्क स्पर्धकांनी भाग घेतला. धुकं, पाऊस, कठीण चढाई, निसर्ग सुंदर असा रोड, जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात स्पर्धकांनी आपले नियोजित अंतर पार केले. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून साधारण २०० धावपटूनी सहभाग नोंदविला होता. कोल्हापूर हे क्रिडेचे माहेरघर आहे तर दुसऱ्या बाजूला असंख्य श्रद्धाळूचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर नगरीत अशा हील मॅरेथॉन प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट आणि कठीण ट्रॅक लवकरच आपल्या कोल्हापूरकरांचा मानाचा तोरा पूर्ण जगामध्ये नाव गाजवेल यात शंका नाही. रननितीतर्फे सर्व जोतिबा भक्तांना आणि सगळ्या प्रकारतल्या खेळाडूंनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून जगातल्या नामांकित गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या स्पर्धेचे नाव सोनेरी अक्षरात झळकावे, यासाठी सहभागी होण्याचे आवाहन याठिकाणी संयोजकांमार्फत करण्यात आले.
२१.१ किमी विजेते (पुरुष)
सर्वसाधारण गट
१. सुरेश चेचर
२. अमेय देसाई
३. शादाब देसाई
२१.१ किमी विजेते (महिला)
सर्वसाधारण गट
१. दीपा तेंडुलकर
२. काव्या देशमुख
३. चारुशीला पाटील
१५ किमी विजेते (पुरुष)
सर्वसाधारण गट.
१. मोहित बेदी
२. रविराज चौगुले
३. युवराज भोसले
१५ किमी विजेते (महिला)
सर्वसाधारण गट.
१. शोभा नदांवडे
२. भक्ती जाधव
३. लक्ष्मी श्री
१० किमी विजेते (पुरुष)
सर्वसाधारण गट.
१. देलमन फैराव
२. विनायक सुतार
३. अजय बाली
१० किमी विजेते (महिला)
सर्वसाधारण गट.
१. प्रिया पंडित
२. स्वाती मोघे
३. विद्या चव्हाण
५ किमी विजेते (खुला गट)
१. प्रथमेश खवरे
२. तेजस्विनी देवकाटे
३. स्नेहल अडके यांच्यासह अन्य स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
यासाठी रेडिओ सिटी मीडिया पार्टनर, रग्गेडीयन जिम फिटनेस पार्टनर, सूर्या हॉस्पिटल मेडिकल पार्टनर, एक्सपोजर अकॅडमी फोटोग्राफी पार्टनर, एस के एम २४ ड्रोन पार्टनर आणि ग्रुप ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी यांचे सहकार्य लाभले.