Thursday, December 19, 2024
Home ताज्या हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी  उद्या.२२ रोजी श्रावण व्रत वैकल्य...

हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी  उद्या.२२ रोजी श्रावण व्रत वैकल्य उपक्रमाचे आयोजन

हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी  उद्या.२२ रोजी श्रावण व्रत वैकल्य उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी सायं.६.०० ते रात्री १०.०० या वेळेत “दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा ७५ व्या अमृत महोत्सवही यामध्ये साजरा केला जाणार आहे. याबाबत शिवालय शिवसेना शहर कार्यालय कोल्हापूर येथे समस्त हिंदू धर्म संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वाना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता आठ वर्षांपूर्वी समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून, या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावातही होत गेले आणि संपूर्ण राज्यभरातील अनेक भागात असे उपक्रम होवू लागल्याने या उपक्रमाची सुरवात कोल्हापुरातून झाली याचा आनंद होत आहे. या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण देशभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छाही व्यक्त केली.
सदर श्रावण व्रतवैकल्या कार्यक्रमाकरिता कमलाकर किलकिले सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणणार आहेत. या कार्यक्रमाची सुरवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने होणार आहे. यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होणार आहे. यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत यज्ञास सुरवात होणार आहे. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित असणार आहेत. यानंतर हिंदू देवतांचे पूजन आणि ५१ महिला भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणणार आहेत. या कार्यक्रमामध्ये एकाचवेळी १०८ जोडपी केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडतील. तर या कार्यक्रमास सुमारे पाच हजार हिंदू जन उपस्थित राहतील. यावेळी एस्कोन भजनी मंडळाचा जप आणि भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.
कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृती असणार आहेत. त्याचबरोबर भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधावाक्यांचे फलक लावणेत येणार आहेत. या कार्यक्रमास हिंदू धर्मातील सर्व पोटजाती, बारा बलुतेदार, जमाती यांच्या प्रतीनिधीसह सर्व प्रमुख मंदिरातील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील हिंदूजणांना व घटकांना एकत्र आणण्यासाठी व हिंदू धर्माचा वसा जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदू जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही समस्त हिंदू धर्म संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस महादेवजी यादव महाराज, सुजित चव्हाण,बाबा वाघापूरकर, हिंदुराव शेळके, चंद्रकांत बराले, सुधीर जोशी, अशोक रामचंदानी, शामराव जोशी, नंदू घोरपडे, श्रीपाद मराठे, मनोहर सोरप, कमलाकर किलकिले, किशोर घाटगे, महेश उरसाल, पराग फडणीस आदी हिंदुत्ववादी संघटनांचे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments