Sunday, December 22, 2024
Home ताज्या बालिंगा सबस्टेशनकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामकाजाकरीता जल उपसा केंद्रावरुन पाणी पुरवठा सोमवारी...

बालिंगा सबस्टेशनकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामकाजाकरीता जल उपसा केंद्रावरुन पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशनकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामकाजाकरीता जल उपसा केंद्रावरुन पाणी पुरवठा सोमवारी बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : बालिंगा जल उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामकाजाकरीता महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लि. यांच्याकडून सोमवार, दि.२२ ऑगस्ट २०२२ रोजी कामकाज पूर्ण होईपर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये बालिंगा अशुध्द/शुध्द जल व नागदेववाडी अशुध्द जल उपसा केंद्रावरुन पाणी पुरवठा बंद रहाणार आहे. विद्युत पुरवठा बंइ होणार असल्याने सोमवारी बालिंगा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणा-या भागांना दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
यामध्ये सोमवारी ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरातील लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भागांचा समावेश आहे. तर संपूर्ण सी डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी, देवलक्लब तसेच ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपूरी ५,६,७,८ वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक या परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments