Friday, December 20, 2024
Home ताज्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस मध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, (डी....

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस मध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, (डी. फार्मसी) कोल्हापूरची सुरुवात

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस मध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, (डी. फार्मसी) कोल्हापूरची सुरुवात

कोल्हापूर/प्रतिनिधी : न्यू पॉलिटेक्निक, कोल्हापूर मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर इंजिनिअरिंग या तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमास या शैक्षणिक वर्षांपासून मान्यता
लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांचे सुपूत्र प्रिन्स शिवाजी यांचे चिरस्मृती प्रित्यर्थ बहूजन समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी सन १९२० मध्ये स्थापना केलेली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ही संस्था “बहूजन हिताय, बहूजन सुखाय” हे ब्रीद घेऊन कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात उच्च प्रगतीपथावर अग्रेसर असणाऱ्या संस्थेस महाराष्ट्र शासनाने “आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.आज या संस्थेने गौरवशाली १०० वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे.
अश्या विविध शैक्षणिक शाखांचे शिक्षण देणाऱ्या या संस्थेत वैद्यकीय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांपासून संस्थेच्या उचगाव येथील न्यू पॉलीटेक्निकच्या २० एकरच्या परिसरामध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, (डी. फार्मसी) कोल्हापूरची सुरुवात करत असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ह्या महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना औषध आणि औषध निर्मिती तसेच संदर्भित मूलभूत संकल्पनांमध्ये पारंगत होण्याची संधी प्राप्त होणार असून फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रासह क्लिनिकल ट्रायल क्षेत्रात ही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त आयटी कंपनी म्हणून ओळख असणार्‍या कंपन्यासुध्दा औषधीनिर्मितीकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होतायत असे त्यांनी प्रतिपादित केले.
१९८३ पासून तंत्रशिक्षणामध्ये अग्रेसर असणाऱ्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित न्यू पॉलिटेक्निक, कोल्हापूर मध्ये “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग” व “इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर इंजिनिअरिंग” या तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमांस २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांपासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिल्याची माहिती संस्थेचे विकास अधिकारी व न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली.यावेळी डॉ. संजय दाभोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, औद्योगिक क्षेत्रामध्ये मानवी बळाचा वापर कमी होत असून दिवसेंदिवस कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारीत ऑटोमायझेशनचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा ऑटोमयझेशनचा कणा असून विकसित देशात त्याचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून भारतातही हे तंत्र विकसित होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे उपग्रह, क्षेपणास्त्रे, रणगाडे, दळण वळण या क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर वाढत आहे. विविध वाहनांमध्ये आता चालकाचे काम आता कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत यंत्रणा करीत असून यापूर्वी अशक्य असणाऱ्या किंवा आता चमत्कार वाटणाऱ्या काही गोष्टी या तंत्रज्ञानाने शक्य होणार आहेत.
बहु-विद्याशाखीय अभियांत्रिकी अशा विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केले आहे ज्यांना अनेक शैक्षणिक शाखा एकत्र करून किंवा समाविष्ट करून एका केंद्रित एकाग्रतेभोवती अभियांत्रिकीचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमूळे औद्योगिक क्षेत्रात बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नवनवीन नोकरीच्या तसेच व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार असल्यामूळे न्यू पॉलीटेक्निक, २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर्स या नव्या अभ्यासक्रमाचीही सुरुवात करत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भविष्यात या क्षेत्रात होणारा विकास, निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी याचा फायदा घेण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित न्यू पॉलिटेक्निकने या शैक्षणिक वर्षापासून “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निग” व “इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर इंजिनिअरिंग” या अभियांत्रिकी पदविका शाखेची मागणी केली होती. त्यासाठी तंत्रनिकेतनातील शिक्षक वर्ग, प्रयोगशाळा यांच्या आधारे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने महाविद्यालयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निग व “इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर इंजिनिअरिंग”या तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमास मान्यता दिल्याचे त्यांनी प्रतिपादित केले.या पत्रकार परिषदेस संस्थेचे चेअरमन श्री. के. जी. पाटील, व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खाजननीस वाय. एस. चव्हाण, विकास अधिकारी व न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments