Thursday, December 26, 2024
Home ताज्या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीची अद्ययावत सेवा आता कोल्हापुरात उपलब्ध

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीची अद्ययावत सेवा आता कोल्हापुरात उपलब्ध

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीची अद्ययावत सेवा आता कोल्हापुरात उपलब्ध

कोल्हापुरात ५४ व्या केंद्राला सुरुवात – भ्रूणशास्त्रज्ञांची अनुभवी टीम आणि अत्याधुनिक उपचारांचा समावेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी भारतातील अग्रगण्य प्रजनन क्षमता आणि आयव्हीएफ साखळींपैकी एक आहे. कोल्हापूर येथे नवे केंद्र सुरू करून दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपला विस्तार केला आहे. शहराच्या मध्यभागी असलेले, कोल्हापूर केंद्र नोव्हाचे ५४ वे केंद्र ठरले आहे. अत्यंत अनुभवी आयव्हीएफ तज्ञ आणि भ्रूणशास्त्रज्ञांच्या अनुभवी टीमद्वारे आधुनिक तंत्रज्ञानासह अत्याधुनिक उपचारांमध्ये प्रवेश प्रदान करून केंद्र जोडप्यांना त्यांच्या प्रजनन प्रवासात मदत करेल.
नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस चंद्रशेखर म्हणाले, “आयव्हीएफ क्षेत्र महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते.
वंध्यत्वासारख्या समस्येला तोंड देताना लोकांना उत्कृष्ट आणि महत्त्वाचे म्हणजे नैतिकतेने उपचार देणाऱ्या प्रजनन केंद्रांची गरज वाढत आहे. पुनरुत्पादक आरोग्याविषयी जागरूकतेचे प्रमाण उंचावले असले तरी लोक अजूनही दर्जेदार उपचारांसाठी इतरत्र धाव घेत असल्याचे आढळून येते. याठिकाणी आम्ही हे आश्वस्थ करू इच्छितो की जोडप्यांना सर्वसमावेशक प्रजनन आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता नाही. कोल्हापुरात आमची नवी ओळख प्रस्थापित करून, आम्ही केवळ शहरातीलच नव्हे तर सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, मिरज, कराड यासारख्या परिघीय भागातही सेवा पुरविण्यास इच्छुक आहोत असे सांगितले.
कोल्हापुरातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी हे सर्वसमावेशक प्रजनन उपचार केंद्र आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह भ्रूणविज्ञान प्रयोगशाळा सुसज्ज आहे आणि प्रजनन उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले जाते. इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या सेवा पुरवण्याव्यतिरिक्त, इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI), इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI), प्री-जेनेटिक टेस्टिंग (PGT), वीर्य विश्लेषण, टेस्टिक्युलर स्पर्म ऍस्पिरेशन (TESA), पर्क्यूटेनियस एपिडिडायमल स्पर्म एस्पिरेशन (PESA), क्रायप्रिझर्वेशन, रक्त चाचण्या आणि इतर प्रजनन क्षमता मूल्यांकन यांसारख्या सेवा देखील प्रदान केल्या जातात.
कोल्हापूर आणि परिसरातील वंध्यत्वाच्या समस्यांबद्दल बोलताना नोव्हा आयव्हीएफ कोल्हापूरचे फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. रत्नाकर रावसाहेब माजळेकर सांगतात, आयव्हीएफ संबंधीत गैरसमजांनी ग्रासलेल्या तसेच जननक्षमतेच्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याची सध्या तीव्र गरज आहे. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) ने अनेक जोडप्यांना पालक बनण्यास मदत केली आहे. आमच्या कोल्हापूर केंद्राच्या माध्यमातून आम्ही केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उच्च दर्जाचे उपचारच देणार नाही, तर जोडप्यांना प्रजनन क्षमता आणि प्रजनन आरोग्याविषयी शिक्षित करू अशी आशा असल्याचे डॉ माजळेकर स्पष्ट करतात.
नोव्हा आयव्हीएफ कोल्हापूर येथील डॉ. इंद्रनील अशोक जाधव फर्टिलिटी कन्सल्टंट यांनी प्रजनन समस्यांच्या कारणांबद्दल सांगितले आणि ते म्हणाले, लोकांना गर्भधारणेमध्ये अडचणी येण्याची अनेक कारणे आहेत जसे की जीवनशैलीच्या समस्या, तणावपूर्ण वेळापत्रक, उशीराने होणारा विवाह, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींचा समावेश आहे. वंध्यत्व ही स्त्री आणि पुरुष दोघांना भेडसावणारी समस्या आहे. पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम), अंड्यांचा दर्जा चांगला नसणे, एंडोमेट्रिओसिस, फॅलोपियन ट्यूब्सचे संक्रमण, यासारख्या आरोग्य समस्यांमुळे स्त्री प्रजनन क्षमतेला बाधा येते. पुरुषांना शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता यासंबंधी समस्या असू शकतात. आजारपण, दीर्घकालीन आरोग्य समस्या, जखम आणि जीवनशैलीचे घटक देखील पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात.
प्रजनन क्षमतेबाबत संभाषण आणि जागरूकता याद्वारेच प्रजनन आरोग्य समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि टाळता येऊ शकतात. आपल्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम करू शकतील अशा अनेक घटकांबद्दल अनेक जोडपी अनभिज्ञ आहेत. उदाहरणार्थ, कोल्हापुर सारख्या प्रदेशात ज्याठिकाणी कडक उन्हाळा असतो, दुचाकीवरून बराच वेळ प्रवास केल्याने अंडकोष जास्त तापू शकतात, ज्यामुळे पुरुष प्रजनन समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या अभावामुळे महिलांना संसर्ग आणि आजार उदभवू शकतात. यामुळे त्यांच्या गर्भधारणेच्या शक्यता देखील कमी होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments