हस्तकला विभागीय कार्यालयास जिल्हा प्रशासनाकडून हवी ती मदत – जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : हस्तकला विभागीय कार्यालयास हवी ती मदत जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल, असे मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले.येथील उद्योग भवन येथे हस्तकला विभागाच्या कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पूर्वी शाहूपुरी पहिली गल्ली येथे असणारे कार्यालय उद्योग भवन येथे स्थलांतरित झाले. उदघाटनंतर हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग यांनी या कार्यालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले की, शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या या कार्यालयाला हस्त कारागिरांनी भेट देऊन त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन देण्याबरोबरच अर्थार्जनही करून आत्मनिर्भर बनावे. सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांबरोबरच नागरिकांनी भेट देऊन यावेळी शुभेच्छा दिल्या. श्री. सिंग, रितेशकुमार, मनोहर मीना आणि नवीनकुमार यांनी स्वागत केले.