Thursday, October 23, 2025
spot_img
Homeदेशमहाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांची मोफत केली गेली तपासणी

महाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांची मोफत केली गेली तपासणी

महाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांची मोफत केली गेली तपासणी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : माझे कुटुंब, माझी जबाबदारी याच धर्तीवर माझे व्यावसायिक, माझी जबाबदारी या संकल्पनेतून महाद्वार व्यापारी रहिवासी संघाच्यावतीने महाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांनी एकत्र येत बाजारपेठ येथील प्रत्येक दुकानदाराची आँक्सिजन लेवल मोफत करण्याचे अभियान राबविण्यात आले.साधारण पणे शंभर पेक्षा अधिक व्यावसायिक बंधूंचे चेकअप करण्यात आले.याच बरोबर व्यावसायिकांनी मास्क चा वापर, सँनिटायझर चा वापर, सोशल डिस्टन्स चे पालन या गोष्टींची खबरदारी घ्यावी अशाप्रकारचे प्रबोधन ही करण्यात आले.
सदर चा उपक्रम हा एक सामाजिक जबाबदारी म्हणून राबविण्यात आला. पुन्हा काही दिवसांनी चेक करण्यासाठी चा संकल्प ही करण्यात आला.या उपक्रमाचे महाद्वार परिसरात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
महाद्वार व्यापारी रहिवासी संघटनचे अध्यक्ष शामराव जोशी ,उपाध्यक्ष महेश उरसाल , कार्याध्यक्ष गुरुदत्त म्हाडगुत , ग्यानभाई नैनवाणी , विनीत नैनवानी , चारुदत्त सूर्यवंशी , अमित माने ,विक्रम निसार , अमित निगवेकर सर , अजित देशपांडे , प्रदीप जरग , गणेश रेळेकर ,शिवनाथ पावसकर ,शशिकांत देढीया , संजय फलटणकर ,श्रीधर चिले , दिपक गुळवणी , अशोक लोहार , कमलेश विरा , विपुल मुळे , यतीन पोसरेकर , वरद देशींगे,संजय हावळ, अमर काकडे , तनसुख खेमसिया ,सुशांत पोतदार आदीं सह व्यापारी रहिवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments