Thursday, December 26, 2024
Home ताज्या आजपासून रंगला के.एम. फुटबॉल चषकाचा थरार

आजपासून रंगला के.एम. फुटबॉल चषकाचा थरार

आजपासून रंगला के.एम. फुटबॉल चषकाचा थरार

कोेल्हापूर,/प्रतिनिधी : झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के. एम. फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते १७ एप्रिल रोजी शाहू स्टेडियमवर स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, २९ एप्रिल रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेते संघ आणि खेळाडूंना सुमारे पाच लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती कृष्णराज महाडिक आणि झुंजार क्लबचे अध्यक्ष योगेश मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळावा, तसेच येणार्‍या काळात देशभरातील लिग सामने खेळण्यासाठी कोल्हापूरची टीम तयार करावी, या उद्देशाने झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांनी के. एम. फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेबाबत माहिती देताना कृष्णराज महाडिक म्हणाले, कोल्हापुरात दर्जेदार फुटबॉल खेळाडू आहेत, पण त्यांना आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन मिळत नाही. चांगल्या खेळाडूंचा शोध घेऊन कोल्हापूर शहराची टीम तयार करण्यासाठी के. एम. चषक स्पर्धेचे आयोजन केले असून, १७ एप्रिलला स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण १४ संघांचा समावेश करण्यात आला आहे. बाद फेरी आणि लिग पद्धतीने होणार्‍या स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख रुपये आणि ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. उपविजेत्या संघास १ लाख रुपये आणि ट्रॉफी, तर तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे ५० हजार आणि २५ हजार रुपयांसह ट्रॉफी दिली जाणार आहे. त्याशिवाय स्पर्धेतील बेस्ट गोलकीपर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट प्लेअर यांनाही टी.व्ही., फ्रीज अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेतील विजेते संघ आणि गुणवंत खेळाडूंना एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेतून कोल्हापुरातील चांगले खेळाडू समोर येतील, असा विश्‍वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. बाद फेरीदरम्यान रोज दोन सामने होणार आहेत, तर लिग सामने रोज एक होतील. २८ एप्रिल रोजी कोल्हापूरच्या मुलींचा संघ बेळगाव किंवा मुंबईच्या महिला संघाशी प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. त्यानंतर कोल्हापुरातील मान्यवर आणि सेलिब्रिटींचाही सामना होणार आहे. या सामन्यांमधून जमा होणारी रक्कम दिवंगत पंच नंदू सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे. सर्व सामन्यांचे प्रक्षेपण कृष्णराज महाडिक यांच्या यु ट्यूब चॅनेलसह बी चॅनेलवरून होणार आहे. पत्रकार परिषदेसाठी झुंजार क्लबचे अध्यक्ष योगेश मोहिते, प्रतीक साळोखे, अमित साळोखे, इंद्रजित महाडेश्‍वर, करण जाधव उपस्थित होते.

चौकट

स्पर्धेतून होणार कोल्हापूरचे ब्रँडिंग
के. एम. चषक फुटबॉल स्पर्धेतून कोल्हापुरातील आघाडीचे उद्योग, व्यवसाय, संस्था यांचे ब्रँडिंग होणार आहे. प्रत्येक संघासाठी स्वतंत्र प्रायोजकांची निवड केली आहे, त्यामुळे ब्रँडिंगसह खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.

चौकट

प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ
प्रेक्षकांसाठी रोज सामन्याच्या तिकिटांमधून लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. यातील विजेत्या प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही के. एम. चषक स्पर्धा लकी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments