इंदिरा नागरी पतंसस्था अध्यक्षना कॉल डिपॉझिट वेळेत परत न दिल्याने दंडासह शिक्षेचा आदेश – ठेवीदाराना मोठा दिलासा
कोल्हापूर /प्रतिनिधी : जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग कोल्हापूर यांनी इंदिरा नागरी सह . पतसंस्था चे (मुख्यालय कागल ) चेअरमन भगवान मनोहर कांबळे यांना ठेवीधारक तक्रारदार शामराव आनंदराव गायकवाड वगैरे यांचे मुदत – कॉल ठेवीच्या (डिपॉझिट ) रकमा व्याजासह आदेश देवूनही अदा केल्या नसलेने ३ ( तीन ) वर्षे शिक्षा व रक्कम रु . ( १०,००० ) दहा हजार दंडाचा आदेश केला आहे .
हा आदेश जिल्हा आयोगाच्या अध्यक्षा सौ . सविता भोसले व सदस्या सौ . रुपाली घाटगे – मनिषा कुलकर्णी यांनी संयुक्तपणे दिला आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोग च्या निर्णयाने पतसंस्था विश्वातील नियमबाहय आणि मनमानी कारभारास नक्कीच आळा बसेल असा विश्वास तक्रारदाराचे वकील उमेश माणगांवे यांनी व्यक्त केला असून यामुळे तमाम ठेवीदारानाही मोठा दिलासा मिळणार आहे ‘ असे ही मत व्यक्त केले आहे.