बेलेवाडीच्या भावेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
बेलेवाडी हुबळगीत दोन कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण
उत्तूर/प्रतिनिधी : बेलेवाडी हुबळगी (ता.आजरा ) गावचे ग्रामदैवत भावेश्वरी देवी मंदिराचा जिर्णोद्धार करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी केले. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते.सरपंच पांडूरंग कांबळे यानी स्वागत केले. ना.मुश्रीफ यांचे हस्ते पावणे दोन कोटी रुपये निधीच्या विकासकामांचे उद्घाटन झाले.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागाचा चेहरा- मोहरा बदलणारे खाते आपल्याकडे आहे. यामुळे विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. भावेश्वरी मंदिराच्या नुतनीकरणासाठी ग्रामस्थानी आराखडा तयार करावा. परगावाहून नागरीक पहायला येतील, असे मंदीर या ठिकाणी उभा राहील.
“जाती-धर्मात भेदाभेद…….”
ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव देसाई भाषणात म्हणाले, देशात जाती -धर्माच्या नावावर जो भेदाभेद सुरू आहे, तो मनस्वी दुःखदायक आहे. जातियवाद्यांचा हा कुटील डाव पुरोगामी महाराष्ट्रात यशस्वी होणारच नाही. मानवजात सुखाने नांदायची असेल तर हे थांबायलाच हवं.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई , पंचायत समीती सदस्य शिरीष देसाई , आनंदराव देसाई यांची भाषणे झाली.यावेळी सभापती उदय पवार, काशिनाथ तेली, मारुतीराव घोरपडे, विजय वांगणेकर, महादेवराव पाटील, उपसरपंच सर्जेराव शिंदे, कुंडलीक शिंत्रे, बाळासाहेब तांबेकर, सात्तापा तोरस्कर, कुंडलीक केसरकर, पी.डी.भाकरे, नारायण देसाई , साताप्पा तोरस्कर, जयवंत कुदळे, दत्तात्रय तोरस्कर, ईश्वर तोरस्कर उपस्थीत होते. पुंडलीक नादवडेकर यानी आभार मानले.