Wednesday, February 5, 2025
spot_img
HomeDevelopment२९ ते ४ फेब्रुवारी कोल्हापूरमध्ये गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग...

२९ ते ४ फेब्रुवारी कोल्हापूरमध्ये गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन व विक्री दालनचे आयोजन

२९ ते ४ फेब्रुवारी कोल्हापूरमध्ये गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन व विक्री दालनचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) यांच्या मार्गदर्शनाखाली भारत हाउसिंग सोसायटी हॉल, आठवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर येथे गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शनाचे व विक्री दालनाचे आयोजन करण्यात आले आहे याचे आज उदघाटन करण्यात आले. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यत सुरू राहणाऱ्या प्रदर्शनी मध्ये विविध २९ राज्यातील ५० कारागीर ५० स्टॉलसह उपस्थित राहतील. एकूण ५० स्टॉलवर हस्तकला कारागीर पारंपारिक कलाकृती या प्रदर्शनात सादर करणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.त्यामुळे कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर आसपासच्या कलाप्रेमी जाणकारांना कला आणि हस्तकलेचा वारसा पाहण्याची आणि हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.वस्त्र मंत्रालय, भारत सरकार (हस्तकला), वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन केले तसेच हे प्रदर्शन भरविण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड केली आहे.
या राष्ट्रीय प्रदर्शनात ग्राहक आणि कारागीर यांच्यात थेट बाजारपेठ जोडण्याची व्यवस्था, ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन गरजेनुसार डिझाइन तयार करून दिले जाते.महाराष्ट्रातील जी. आय. मानांकन प्राप्त पुणेरी पगडी, कोल्हापूरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी तसेच सोलापूरी चादर टॉवेलचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.विविध राज्यांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पगुरु, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र धारक, राज्य पुरस्कार विजेते, बचत गट इत्यादींचा या मध्ये सहभाग आहे.
या प्रदर्शनात आर्ट मेटल वेअर, बीड्स क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादन, कार्पेट, शंख-शिंपले, बाहुली आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशेटेड वस्तू, काच, गवत, पाने, वेत वेळू आणि फायबर उत्पादन, हाताने छापलेले कापड स्कार्फ, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूट क्राफ्ट, तंजावर पेंटिंग, टेक्सटाईल (भरतकाम), लाकडी वस्तू, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी ज्वेलरी क्राफ्ट, विविध पेंटिंग. छत्तीसगड डोकरा कास्टिंग, मधुबनी पेंटिंग, पंजाबची फुलकारी फॅब्रिक्स अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत.त्यामुळे कोल्हापूर शहर वासीयांनी ह्या प्रदर्शनाला भेट द्यावी व हस्तकलेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments