Wednesday, December 25, 2024
Home ताज्या कागलमध्ये शिवजयंती अमाप उत्साहात         बानगेचे शहीद...

कागलमध्ये शिवजयंती अमाप उत्साहात         बानगेचे शहीद जवान राकेश निंगूरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार – मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निंगुरे कुटुंबियांचा सत्कार         कागल/प्रतिनिधी :  कागल शहरामध्ये अमाप उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा झाला. बसस्थानक परिसरातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला बानगे ता. कागल येथील शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व तहसीलदार तथा नगरपालिकेच्या प्रशासक सौ. शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते पुतळ्याला जल व दुग्धाभिषेक घालण्यात आला.           अधिक माहिती अशी, कागल येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या नियोजनाची बैठक कागल शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली होती. तीमध्ये कागलचे नगरसेवक विशाल पाटील यांनी मिरवणुकीची सुरुवात बानगेचे शहीद जवान राकेश निंगूरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याच्या पूजनाने करावी, अशी  केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नगरसेवक श्री. पाटील यांचे निधन झाले. त्यावेळी झालेल्या शोक सभेमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नगरसेवक विशाल पाटील यांची शेवटची इच्छा पूर्ण करूया, असे आवाहन केले होते.  दुःख बाजूला सारून…….. भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नगरसेवक विशाल पाटील यांची इच्छा होती की, शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्हावी. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनीच त्याचे निधन झाले  त्यामुळे त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही निगुरे कुटुंबियांना विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन निंगुरे कुटुंबीय आपले डोंगराएवढे दुःख बाजूला सारून या कार्यक्रमासाठी आले. त्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या कुटुंबीयांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमानंतर त्यांनी नगरसेवक विशाल पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.         यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, चंद्रकांत गवळी,प्रविण काळबर,  नितीन दिडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, विवेक लोटे, सौरभ पाटील, इरफान मुजावर, संजय ठाणेकर यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.          दरम्यान  कागल नगरपरिषद आवारातही  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . मत्री हसन मुश्रीफ,  पालिकाच्या प्रशासक तथा तहसिलदार शिल्पा ठोकड़े यानी पुतळ्यास अभिवादन केले . याचबरोबर शिवाजी चौकात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . येथील  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या  पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मंत्री मुश्रीफ यांनी अभिवादन केले . यावेळी शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते. खर्डेकर चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती सोहळा साजराकरण्यात आला .शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले भगवे झेंडे आणि छपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते .

कागलमध्ये शिवजयंती अमाप उत्साहात

बानगेचे शहीद जवान राकेश निंगूरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार – मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निंगुरे कुटुंबियांचा सत्कार

कागल/प्रतिनिधी :  कागल शहरामध्ये अमाप उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा झाला. बसस्थानक परिसरातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला बानगे ता. कागल येथील शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व तहसीलदार तथा नगरपालिकेच्या प्रशासक सौ. शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते पुतळ्याला जल व दुग्धाभिषेक घालण्यात आला.अधिक माहिती अशी, कागल येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या नियोजनाची बैठक कागल शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली होती. तीमध्ये कागलचे नगरसेवक विशाल पाटील यांनी मिरवणुकीची सुरुवात बानगेचे शहीद जवान राकेश निंगूरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याच्या पूजनाने करावी, अशी  केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नगरसेवक श्री. पाटील यांचे निधन झाले. त्यावेळी झालेल्या शोक सभेमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नगरसेवक विशाल पाटील यांची शेवटची इच्छा पूर्ण करूया, असे आवाहन केले होते.

दुःख बाजूला सारून……..

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नगरसेवक विशाल पाटील यांची इच्छा होती की, शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्हावी. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनीच त्याचे निधन झाले  त्यामुळे त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही निगुरे कुटुंबियांना विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन निंगुरे कुटुंबीय आपले डोंगराएवढे दुःख बाजूला सारून या कार्यक्रमासाठी आले. त्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या कुटुंबीयांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमानंतर त्यांनी नगरसेवक विशाल पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, चंद्रकांत गवळी,प्रविण काळबर,  नितीन दिडे, मुख्याधिकारी पंडितपाटील, विवेक लोटे, सौरभ पाटील, इरफान मुजावर, संजय ठाणेकर यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.                                          दरम्यान  कागल नगरपरिषद आवारातही  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . मत्री हसन मुश्रीफ,  पालिकाच्या प्रशासक तथा तहसिलदार शिल्पा ठोकड़े यानी पुतळ्यास अभिवादन केले . याचबरोबर शिवाजी चौकात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . येथील  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या  पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मंत्री मुश्रीफ यांनी अभिवादन केले . यावेळी शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते. खर्डेकर चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती सोहळा साजराकरण्यात आला .शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले भगवे झेंडे आणि छपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments