Sunday, July 14, 2024
Home ताज्या ‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी), संचालकसो व अधिकारी  यांच्‍या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करण्‍यात आले.
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक स्वराज्य उभे केले. गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी विविध माध्यमातून सामजिक, सार्वजनिक, राजकीय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिव विचारच मार्गदर्शक ठरत  आहेत. गोकुळ परीवातील सर्वांनी  महाराजांचे  आचार -विचार  आचरणात आणावेत यामुळे संस्था बळकटीकरणास  नक्कीच मदत होईल.असे मनोगत  गोकुळचे चेअरमन श्री.विश्वास पाटील यांनी शिवजयंती निमित्त संघाच्या ता.पार्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी मनोगत संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, व संचालक अजित नरके यांनी केले व आभार संकलन सहा.व्‍यवस्‍थापक बी.आर.पाटील यांनी मानले, सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी  केले. व
यावेळी संघाचे चेअरमन मा. श्री. विश्वास पाटील,विभागीय उप.आयुक्‍त राज्‍य उत्‍पादन शुल्‍क कोल्‍हापूर यशवंत पवार, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, अंबरिषसिंह घाटगे, डेअरी व्‍यवस्‍थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु.व्‍ही.मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍‍ही. तुरंबेकर व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleकागलमध्ये शिवजयंती अमाप उत्साहात         बानगेचे शहीद जवान राकेश निंगूरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार – मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निंगुरे कुटुंबियांचा सत्कार         कागल/प्रतिनिधी :  कागल शहरामध्ये अमाप उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा झाला. बसस्थानक परिसरातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला बानगे ता. कागल येथील शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व तहसीलदार तथा नगरपालिकेच्या प्रशासक सौ. शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते पुतळ्याला जल व दुग्धाभिषेक घालण्यात आला.           अधिक माहिती अशी, कागल येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या नियोजनाची बैठक कागल शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली होती. तीमध्ये कागलचे नगरसेवक विशाल पाटील यांनी मिरवणुकीची सुरुवात बानगेचे शहीद जवान राकेश निंगूरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याच्या पूजनाने करावी, अशी  केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नगरसेवक श्री. पाटील यांचे निधन झाले. त्यावेळी झालेल्या शोक सभेमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नगरसेवक विशाल पाटील यांची शेवटची इच्छा पूर्ण करूया, असे आवाहन केले होते.  दुःख बाजूला सारून…….. भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नगरसेवक विशाल पाटील यांची इच्छा होती की, शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्हावी. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनीच त्याचे निधन झाले  त्यामुळे त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही निगुरे कुटुंबियांना विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन निंगुरे कुटुंबीय आपले डोंगराएवढे दुःख बाजूला सारून या कार्यक्रमासाठी आले. त्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या कुटुंबीयांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमानंतर त्यांनी नगरसेवक विशाल पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.         यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, चंद्रकांत गवळी,प्रविण काळबर,  नितीन दिडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, विवेक लोटे, सौरभ पाटील, इरफान मुजावर, संजय ठाणेकर यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.          दरम्यान  कागल नगरपरिषद आवारातही  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . मत्री हसन मुश्रीफ,  पालिकाच्या प्रशासक तथा तहसिलदार शिल्पा ठोकड़े यानी पुतळ्यास अभिवादन केले . याचबरोबर शिवाजी चौकात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . येथील  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या  पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मंत्री मुश्रीफ यांनी अभिवादन केले . यावेळी शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते. खर्डेकर चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती सोहळा साजराकरण्यात आला .शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले भगवे झेंडे आणि छपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते .
Next article‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments