महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने नववर्षाचे स्वागत साधेपणानेच
कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : आज मुंबईत १९० रुग्ण हे मुंबईमध्ये एका दिवसात आढळून आलेले आहेत कोरोनाच्या रुग्ण पाठोपाठ ओमोक्रॉंनचे रुग्ण वाढत चालले असून आज एका दिवसात इतकी रुग्ण वाढल्याने ३१ डिसेंबर च्या आदल्या दिवशी ३० डिसेंबर रोजी ही संख्या वाढल्याने महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसून येत असून नववर्षाचे स्वागत हे साधेपणाने करण्याचे आवाहन जनतेला राज्य सरकारने केलेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा तिसरी लाट येऊ घातलेली आहे असे तज्ञांनी मत व्यक्त केल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच कडक निर्बंध महाराष्ट्र राज्यामध्ये लादण्यात आलेले आहेत आणि हे निर्बंध जानेवारी फेब्रुवारी मध्ये आणखीच वाढतील असे संकेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून आता ओमिक्रोन हा भारतासाठी शाप ठरणार की वरदान असे बोलले जात आहे मुळात ओमोक्रॉंन दक्षिण आफ्रिकेमधून व्हायरल झालेला आहे आणि आता संपूर्ण जगभरात हा विस्तारला असून आज एकट्या मुंबईमध्ये १९० रुग्ण व सापडलेले आहेत आणि कोरोनाचेही एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब असून मुंबई पुण्यामध्ये ही संख्या वाढत चालली आहे त्यामुळे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा खडक निर्बंधाचा सामना लोकांना करावा लागणार असून नववर्ष हे पूर्ण सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच लॉकडाऊनचे संकेत सुरू झालेले आहेत त्यामुळे ७ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आले असून नववर्षाच्या सुरुवातीलाच आता लोकांना हे लॉकडाऊन चिंता लागून राहिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत चाललेली कोरोनाची रुग्णसंख्या ही पुन्हा एकदा वाढली तर लोकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागेल असे बोलले जात आहे. आधीच दोन वर्ष कोरोनाने लोकांचे हाल हाल केलेले आहेत आणि आता कुठे पूर्वीसारखे दिवस येऊ लागले असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईमध्ये चिंतेचे वातावरण व्यक्त केले जात आहे मुंबईतील लोक इतरत्र मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने कठोर निर्बंध लादण्याचे संकेत येऊ घातलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नववर्षाचे स्वागत घरीच करावे असे आवाहन केले आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर काहीशी बंदी घालण्यात त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेले आहे भारतामधील २० पेक्षा अधिक देशांमध्ये ओमोक्रॉंनचा विळखा वाढत चाललेला आहे त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून जर रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर मात्र पुन्हा एकदा लोकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे आणि लोकांना हेच नको होते मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आता पुन्हा एकदा आपल्या नातेवाईकांपासून मित्र परिवारापासून लांब रहावे लागेल की काय अशी शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे सध्या वाढत चाललेली कोरोना व ओमोक्रॉंन रुग्ण पुन्हा एकदा लोकांसाठी घातक ठरते की काय असे चित्र असून येत्या दोन दिवसांमध्ये निर्बंधांचे खरे चित्र स्पष्ट होईल आणि निर्बंध घातले जातील असे सरकारकडून संकेत दिले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्याची वाटचाल ही लॉकडाऊनच्या दिशेने सध्यातरी चाललेली आहे त्यामुळे नवीन वर्ष हे पुन्हा एकदा तिसरी लाट घेऊन येणार असल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहे त्यामुळे लोकांनी आतापासूनच योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे मात्र आता कुठे सुरळीत सर्व काही सुरू झाले असताना पुन्हा एकदा तिसरी लाट येऊ घातलेले आहे त्यामुळे आणखी काय काय नुकसान होणार आहे कोणास ठाऊक?