Sunday, December 22, 2024
Home ताज्या ऐतिहासिक बिंदू चौकाच्या सुशोभीकरणाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट

ऐतिहासिक बिंदू चौकाच्या सुशोभीकरणाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट

ऐतिहासिक बिंदू चौकाच्या सुशोभीकरणाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौकाच्या सुशोभीकरणाबाबत आज अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली.ऐतिहासिक, सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या क्रांतीचा साक्षीदार असलेल्या बिंदू चौकाचा समावेश वारसा स्थळात असून याचे सुशोभीकरण करण्यासाठीचा सविस्तर आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना* अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतील तयार केलेला भारतातील एकमेव पुतळा* अशी बिंदू चौकातील पुतळ्याची ओळख आहे. ९ डिसेंबर १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या दोन महापुरुषांचे पुतळे चौकात बसवण्यात आले. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्यातील हौताम्यांचा साक्षीदार असलेला हा चाैक सामाजिक क्रांतीला प्रेरणा देत आहे.देशभरातील पर्यटक तसेच आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे, बिंदू चौकाचे सुशोभीकरण होणे गरजेचे असून खऱ्या अर्थना शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा सर्वांना मिळेल आणि त्यांचे विचार पुढे जातील. या सुशोभीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून या ठिकाणी व्हर्टिकल गार्डन, आकर्षक माहिती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, शहारअभियंता नेत्रदीप सरनोबत, उदय गायकवाड, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, डीगे फौंडेशनचे सदानंद डिगे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आदिल फरास, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, मुस्लिम बोर्डिंग चे चेअरमन गणी आजरेकर अशपाक काजरेकर, संदीप चौगुले, आरपीआय महिला आघाडीच्या रूपाताई वायदंडे, कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments