Saturday, December 21, 2024
Home ताज्या शितोळे हॉस्पिटलची नवी वाटचाल "वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची" सुरुवात

शितोळे हॉस्पिटलची नवी वाटचाल “वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची” सुरुवात

शितोळे हॉस्पिटलची नवी वाटचाल “वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची” सुरुवात

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील सर्वानाच परिचित असलेल्या शितोळे हॉस्पिटलने आता आपली आणखी नवी वाटचाल सुरू केली आहे.वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची सुरुवात येथील महावीर कॉलेज जवळील पॅलेस रोडवर केली आहे.या युनिटचे उदघाटन येत्या १८ डिसेंम्बर रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. अशोक भूपाळी यांच्या व शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. डि.टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे यावेळी गोकुळ संचालक श्री.अरुण डोंगळे, आराम गादी कारखाना श्री.अविनाश वाडीकर,लकी फर्निचरचे श्री.राजेंद्र बडे,,माजी डी. वाय. एस. पी श्री.सुरेश पवार,साई बिल्डर्सचे श्री.प्रकाश मेधशिंगे व श्री.मदन घाडगे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती डॉ. महेश्वर शितोळे व डॉ. आशा शितोळे,डॉ. डी. जी.शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या युनिटच्या माध्यमातून सर्व तपासण्यांची सोय आकर्षक सवलतीच्या दरामध्ये एकाच छताखाली उपलब्ध केली गेली आहे तसेच अंथरुणावर झोपलेल्या रुग्णांना घरी जाऊन तपासणी पासून ते औषध देण्यापर्यंतची सोय ही याठिकाणी केली गेली आहे या युनिटचा प्रमुख उद्देश कोणताही आजार होण्याआधी त्याची प्रतिबंधात्मक काळजी घेणे दीर्घकालीन आजार उदाहरणार्थ मधुमेह, उच्च रक्तदाब, थॉयराईड ,संधिवात, मानसिक आजार, पी-सी-ओ-डी, वंधत्व, दातांचे व हिरड्यांचे आजार तसेच या आजारांपासून होणाऱ्या इतर समस्या टाळण्यासाठी अचूक निदान करून वेळेत मार्गदर्शनाने उपचार करणे तसेच सध्या डब्ल्यूएचओ प्रमाणे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही खूप गरजेचे आहे त्यामुळे रुग्णाची इच्छाशक्ती वाढते रुग्णांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढत जातो आणि त्यामुळे तो रुग्ण मानसिकदृष्ट्या खंबीर होऊन कोणत्याही आजारावर मात करू शकतो त्यासाठी मेडिकल अँस्ट्रोलॉजी ओ.पी.डी सुरू केली असल्याचे डॉ.शितोळे यांनी सांगितले.
त्यामध्ये रेकी आणि टॅरो कार्ड मार्गदर्शन रेकी मास्टर युगंधरा दुधाळे या देणार आहेत तसेच मधुमेह मुळे डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण किती आहे याची तपासणी करण्यासाठी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर माने यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच बालरोग विभाग आणि स्त्रीरोग विभाग ही या ठिकाणी कार्यरत असून या युनिटच्या माध्यमातून मधुमेह डोळ्यांचे शिबिर मधुमेहमुळे पायाचा बधिरपणा, मधुमेह दातांची इजा,मधुमेह स्त्रियांचे आजार तसेच मधुमेह बालकांचे आजार तसेच रेकी आणि कुंडलिनी योगा कोर्सेस शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.यावेळी पत्रकार परिषदेस जीवन पाटील,लॅब टेक्निशियन गणेश चिलमुर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments