Sunday, December 22, 2024
Home ताज्या मानवी वस्तीत गव्याचा वावर पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री यांची आढावा...

मानवी वस्तीत गव्याचा वावर पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री यांची आढावा बैठक

मानवी वस्तीत गव्याचा वावर पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री यांची आढावा बैठक

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहर परिसरातील मानवी वस्तीत गव्याचा वावरल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. गव्याच्या हल्ल्यात जिल्ह्यातील दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे दुर्घटना घडू नये व मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात.रान हत्तींसाठी कॉलर आयडी बसविण्याबाबत ओरिसा राज्याच्या वनविभागाकडून माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आलाय असून अशा उपाययोजनांमुळे रानहत्ती व मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
पन्हाळा तालुक्यातील कळे येथे दलदलीत अडकलेल्या जखमी झालेल्या एका गव्याचा मृत्यू झाला असून कोल्हापूर शहर परिसरात दोन रानगवे आढळून आले होते. हे गवे पुन्हा त्यांच्या अधिवासात परत गेले आहेत. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्याचे आढळल्यास अथवा वनविभागाशी संबंधित काही माहिती हवी असल्यास यासाठी ‘हॅलो फॉरेस्ट १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
यावेळी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वन परीक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments