गार्गीज क्लबचे मॅडी तामगावकर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
कोल्हापूर / प्रतिनिधी : डी. आय. डी.फौंडेशन व डी.आय. डी. गार्गीज क्लब चे संस्थापक अध्यक्ष मॅडी तामगावकर यांना एल्फस स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी दिल्लीची डॉक्टरेट पदवी एल्फस स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी दिल्लीचे कुलगुरु डॉ.अंजु भंडारी यांच्या हस्ते रजिस्ट्रार डॉ.के.डी.आर्या, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह कळंबाचे अधीक्षक श्री. चंद्रमणी इंदुलकर, राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष गोवा दिव दमन अजित देसाई,मिस्टर एशिया डॉ विशाल कांबळे, आय एफ एफ बी प्रो जानवी पांडव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
मॅडी याना समाजकरणाची आवड असल्याने त्यांनी डी आय डी फौंडेशन ची स्थापना केली तर
आपला व्याप सांभाळत २०१३ साली ते समाजकारणात सक्रिय झाले, आतापर्यत ५०० हुन अधिक गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत केली असून,त्यांनी तृतीयपंथी, दिव्याग, मतिमंद, अंध, कर्णबधिर, मूकबधिर वारांगना बघिणी यांना अनेक वेळा वेगवेगळी शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून समाजात त्यांना मान सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत.आतापर्यत त्यांनी पोलीस मित्र समिती कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख, युवा पत्रकार संघ करवीर अध्यक्ष,रामदास आठवले प्रतिष्ठान सांस्कृतिक विभाग प्रमुख, आंतरराष्ट्रीय डान्स कोन्सिल सी आय डी फ्रान्स चे प्रमुख अधिकारी म्हणून काम पाहिले आहेत, या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना दिनांक ६ डिसेंबर रोजी ही डॉक्टरेट डिग्री प्रदान करण्यात आली.