- ४ थ्या खेलो इंडिया राज्य निवड चाचणीसाठी कोल्हापुर जिल्ह्याचा बास्केटबॉलचा संघ जाहीर
कोल्हापूर/प्रतिनिधी : औरंगाबाद येथे होणा-या १२ ते १६ डिसेंबर रोजीच्या खेलो इंडिया महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल १८ वर्ष वयोगटातील मुलांचा-मुलींचा संघ जाहिर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष कोल्हापुर जिल्हाचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री श्री सतेज पाटील यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले आणि या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करून जास्तीत जास्त खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्थान मिळवावे अशी अपेक्षा जाहीर केली. खेळाडूंनी तंत्रशुद्ध आणि अॅडव्लास टेकनिकच्या जोरावर जिल्हाच्या संघाला अंतिम फेरी पर्यंत मजल मारावी असे आव्हान केले. यावेळी क्रिडा अधिकारी श्री. बालाजी बरबडे संघटनेचे उपाध्यक्ष श्री. नितीन दळवाई, श्री. हितेश मेहता, सचिव डॉ. शरद बनसोडे, डॉ. राजेंद्र रायकर, श्री नंदकुमार मोठे, डॉ सुरेश फराकटे, अँड. किरण कोष्टी, विनायक साळोखे अमित दलाल, श्री विश्वास चोपडे तसेव श्री उदय पाटील (वारणा), विकास जाधव (घुणकी), विनोद उथळे हे उपस्थित होते.
मुलांच्या संघामध्ये –
वासिम मुल्ला (कर्णधार), अभिषेक कुमार, सत्यजित डाले, जयंत शिंदे, सार्थक वायकर, विश्वजित रामसिंग, वेदराज पाटील, समीर कनबोगी, सुमेद पाटील, सौरभ कुंभार, यश जाधव संघाचे प्रशिक्षक श्री अमित दलाल संघ व्यवस्थापक शुभम पाटील
मुलीचा संघामध्ये –
समिक्षा सं. पाटील (कर्णधार), स्नेहा कोळी, मयुरी टिके, पुर्वा हुल्ले, आदिती पारगांवकर, पुर्वा भोसले, मनस्वी मोरे, सानिका फुले, समिक्षा प्र. पाटील, दिव्यानी पाटील, जान्हवी खामकर, निकीता साली संघाची प्रशिक्षिका तेजस्विनी महाडिक, संघ व्यवस्थापक रोहित घेवारी
सदरची स्पर्धा विभागीय किडा संकुल, गारखेडा औरंगाबाद येथे पार पडणार आहेत. या स्पर्धेतुन हरियाणा येथे होणा-या ४थ्या खेले इंडियासाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे. तसेच इंदोर येथे होणा-या १८ वर्ष वयोगटातील अखिल भारतीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा मुलांचा व मुलींचा संघ निवडला जाणार आहे. तसेच १५,१६ डिसेंबर रोजी वरिष्ठ गटातील पुरुष व महिलाचा महाराष्ट्राचा संघ येथे निवडण्यात येणार आहे.