केडीसीसी बँकेत महात्मा गांधीजीना अभिवादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए. बी. माने यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बँकेचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे, आर.जे.पाटील, तसेच उपव्यवस्थपक सुनिल वरुटे, राजू पाटील, गिरीष पाटील, संभाजी पाटील, दीपक चव्हाण, निलेश देसाई, किशोर सनगर, महादेव पाटील, रघुनाथ हांडे, मनोज आपटे, भरतेश्वर खिचडे, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.