महानगरपालिका शिक्षक पतसंस्थेची कर्जमर्यादा ३५ लाख
कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची कर्जमर्यादा ३५ लाख रुपये करण्याच्या उपविधीला ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी दिल्याची माहिती सभापती संजय पाटील यांनी दिली.कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ५८ सभा ऑनलाईन खेळीमेळीत पार पडली.
सभासदाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची माहिती सेक्रेटरी सुधाकर सावंत,सभापती संजय पाटील, खजानिस उमेश देसाई यांनी दिली.यावेळी संस्थेचे भाग भांडवल दोन कोटी करणे. सभासद मयत झाल्यास त्यांच्या कर्जमाफीसाठी योजना,कर्ज मर्यादित वाढ करण्याचा उपविधी संस्थेच्या नावात बदल करण्याचा उपविधी,तसेच संस्थेने केलेल्या नवीन इमारतीच्या व्यवहाराच्या अनुषंगाने खर्चास तसेच अन्य सर्व विषयाला मंजुरी या सभेत सभासदांनी दिली.यावेळी उपसभापती मनोहर शिंदे, प्रकाश पाटील, संजय कडगावे,शिवराज नलवडे ,वसंत आडके,सुभाष धादवड, राजेंद्र गेंजगे,सरिता सुतार,आशालता काजर, विजय माळी,शकील भेंडवडे, विजय जाधव,उत्तम गुरव व सर्व स्टाफ उपस्थित होते.तंत्रस्नेही शिक्षक सुभाष माने व योगेश व्हटकर यांनी तांत्रिक बाजू पाहिली
आभार संस्थेचे खजानिस उमेश देसाई यांनी मानले.