शाळा सुरु करण्या बाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत शिक्षक समिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिक्षक समितीने शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.समितीने पोस्टकार्ड चळवळ सुरू केली. यामध्ये शिक्षक पालक विद्यार्थी या सर्वांनी शाळा सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्या कडे पत्रे पाठवून केली.शहरी-ग्रामीण असा भेदभाव न करता इयत्ता पहिली पासून शाळा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे
शाळा सुरू होण्याच्या दिवसापासून पर्यवेक्षकीय यंत्रणांनी वार्षिक नियोजन,मूल्यमापन नियोजन या नेहमीच्या पद्धतीने सर्वेक्षण न करता दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळेपासुन दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याकरिता बालकांची भरकटलेली मने समजून घेऊन शिक्षकांना त्यांच्या पद्धतीने कामकाज करण्यास मोकळीक देणे अत्यावश्यक आहे तसेच अध्ययन-अध्यापन दरम्यान प्रशिक्षणे सर्वेक्षणे अशैक्षणिक कामे शिक्षकांना लावू नयेत अशा मागणीचा ठराव समितीच्या बैठकीत घेण्यात आला .या बैठकीस शिक्षक समितीचे मनपा राज्य प्रमुख सुधाकर सावंत ,राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे,सुभाष धादवड,वसंत आडके,प्रकाश पाटील,मयुर जाधव,फारुक डबीर,शकील भेंडवडे, युवराज सरनाईक,सुनील पाटील,उत्तम कुंभार,सुभाष माने,आशालता कांजर ,सरीता सुतार विनोदकुमार भोंग आदि उपस्थित होते.