सैनिकाचे आत्मबळ वाढवणारा देश रक्षाबंधन हा स्वामी विवेकानंद ट्रस्ट या उपकम ही लोकचळवळ बनावी – शिवाजी राव पोवार
कोल्हापूर/प्रतिनिधी : पारंपारिक बंधू प्रेमाच्या रक्षाबंधनाला श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट ने कारगील युध्दापासून गेली २२ वर्ष एक राखी सीमेवरील जवान साठी हा देश रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आहे , सैनिकाचे नैतिक बळ वाढवणारा हा उपक्रम भविष्यात लोक चळवळ व्हावा ‘ अश्या शब्दात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजीराव पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . महासैनिक दरबार येथे झालेल्या या सोहळ्यात निमंत्रित शालेय विध्यार्थीनी व महिला कार्यकर्या सहभागी झाल्या होत्या . प्रांरभी सचिव राजेंद्र मकोटे यांनी प्रास्ताविक करताना ‘ विवेकानंद ट्रस्ट वतीने प्रतिवर्षी एक लाखाहून अधिक जमा झालेल्या राख्या थेट सीमेवर पाठवल्या जातात , यावेळी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून जमा झालेल्या राख्या पाठवण्यात येत आहेत. आगामी वर्षी यांचे व्यापक प्रमाणा त नियोजन करू , गोवा राज्यासह सर्वत्र या देशरक्षा बंधनाचे अनुकरण होत आहे ‘ असे नमूद केले . तर अध्यक्ष किशोर घाटगे यांनी ‘ शालेय मुल्य शिक्षणाचा भाग म्हणून हा उपक्रम सर्वत्र राबवला जावा तसेच महानगर पालिकेने आपल्या बोधचिन्ह प्रमाणे महाराणी ताराराणी च्या नांवे मुलीसाठी सैनिकी शाळा सुरु करावे ‘ आता न्यायालयाने ही त्यास अनुमती दिली आहे ‘ असे आग्रहाने प्रतिपादन केले . जिल्हा सैनिक अधिकारी निवृत्त सुभेदार शिवाजीराव पोवार व त्यांच्या सहकारी यांचे कडे यांच्याकडे संकलित राख्या निवृत्तसुभेदार एन एन पाटील ( सांगवेकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सावली कचरे , सीमा मकोटे , सुशिला पाटील ,सुखदेव गिरी ,कमलाकर किलकिले ,महेश कामत ,मालोजी केरकर यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आल्या . कोल्हापूरची विधायक ओळख ठरणारा हा उपक्रम आहे अश्या शब्दात एन. एन. पाटील यांच्या गौरवपर शब्दांत अपौचारिक आभारासह या सोहळ्याचा समोराप झाला .