Thursday, December 5, 2024
Home ताज्या तीन सब स्टेशनची उंची वाढवण्यासाठी ७.२१ कोटी रूपयांचा निधी द्या : आमदार...

तीन सब स्टेशनची उंची वाढवण्यासाठी ७.२१ कोटी रूपयांचा निधी द्या : आमदार चंद्रकांत जाधव

तीन सब स्टेशनची उंची वाढवण्यासाठी ७.२१ कोटी रूपयांचा निधी द्या : आमदार चंद्रकांत जाधव

वीज वितरण कंपनीचा प्रस्ताव : पुरामुळे शहराचा वीज पुरवठा खंडीत होणार नाही

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या दुधाळी, नगाळा पार्क व बापट कॅम्प या तीन सब स्टेशनची उंची वाढवण्यासाठी ७.२१ कोटी रूपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. मुंबईत मंत्रालयात मंत्री राऊत यांना आमदार जाधव यांनी निवेदन दिले.
कोल्हापूर शहराला वीज पुरवठा करण्यासाठी सोळा सबस्टेशन आहेत. यापैकी दुधाळी, नागाळा पार्क, बापट कॅम्प ही तीन सबस्टेशन जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुराच्या पाण्याखाली गेली होती. त्यामुळे सुमारे ७३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होत झाला होता. त्यावेळी आमदार जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पुरामुळे शहराचा वीज पुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना येत्या सहा महिन्यात करून घ्या अशा सूचना आमदार जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार दुधाळी, नगाळा पार्क व बापट कॅम्प या तीन सब स्टेशनची उंची वाढविणेसाठी ७.२१ कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तयार केला आहे.
आमदार जाधव यांनी मंत्री राऊत यांची भेट घेऊन वीज वितरण कंपनीचा प्रस्ताव व निवेदन दिले.
पुराच्या पाण्यामुळे प्रत्येक वर्षी शहरातील सुमारे ७३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होतो आणि वीज नसल्याने जनतेची मोठी गैरसोय होते. त्यामुळे सबस्टेशनची उंची वाढवण्यासाठी तात्काळ निधी द्यावा अशी मागणी आमदार जाधव यांनी मंत्री राऊत यांच्याकडे केली. यावेळी मंत्री राऊत यांनी प्रस्ताव मंजूर करून निधी देण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments