Sunday, December 22, 2024
Home ताज्या मराठा आरक्षाणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची मराठा समाज नेत्यांकडून तोडफोड

मराठा आरक्षाणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची मराठा समाज नेत्यांकडून तोडफोड

मराठा आरक्षाणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची मराठा समाज नेत्यांकडून तोडफोड

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची मराठा समाजाच्या नेत्यांकडून आज दि. २६ मे रोजी तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात असणाऱ्या सूर्या रुग्णालय येथे घडला आहे. ‘सेव्ह मिरीट सेव्ह नेशन’ या संस्थेच्या वतीने आरक्षणातून झालेली भरती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे संतापले नागरिकांनी संस्थेचे सदस्य असलेले डॉ. तन्मय व्होरा यांच्या रुग्णालयावर हल्लाबोल केला. दरम्यान, डॉ. तन्मय व्होरा यांनी मराठा समाजाची माफी मागत माझा यांच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. तर तरुणांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. असे असताना ‘सेव्ह मिरीट सेव्ह नेशन’ या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरक्षणातून झालेली भरती रद्द करावी, असे पत्र पाठवण्यात आले आहे. हे पत्र मराठा समाजाच्या हाती लागले आहे. त्याचे सदस्य असलेले कोल्हापुरातील डॉ. तन्मय व्होरा यांची माहिती घेऊन कोल्हापुरातील मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या रुग्णालयासमोर निदर्शन केली. यावेळी व्होरा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी व्होरा यांच्या रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्याने घोषणाबाजी करत रुग्णालयातील फलकाची तोडफोड केली. यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे कोरोनावर उपचार सुरू असणारे रुग्ण, नातेवाईक, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भीतीने तारांबळ उडाली. त्यांनी पटापट दरवाजे बंद करत स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना जिन्यातच रोखले. तन्मय व्होराने मराठा समाजाची माफी मागून पत्र मागे घ्यावे, अशी आंदोलकांनी मागणी केली. मात्र, आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
डॉ. तन्मय व्होरासंबंधित पत्र कोणी पाठवले याची कल्पना मला नाही. मी त्या संस्थेचा सभासद असलो तरी या पत्राची माझा कोणताही संबंध नाही. जर मराठा समाजाच्या भावना मी दुखावल्या असतील तर संपूर्ण मराठा समाजाची मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया डॉ. तन्मय व्होरा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments