सातारा जिल्हा काँग्रेस कायदा विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी अॅड.अमित जाधव यांची निवड
कराड/प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कायदा विभाग याचे सातारा जिल्हाध्यक्ष पदी कराड येथील अॅड.अमित वसंत जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कायदा विभागाचे अध्यक्ष अॅड.असिफ कुरेशी यांनी अॅड.अमित जाधव यांना नुकतेच निवडीचे पत्र दिलेले आहे.
या निवडीनिमित्त माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच अॅड.अमित जाधव यांना निवडीचे पत्र देत अभिनंदन केले.
याप्रसंगी अॅड.अमित जाधव म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कायदा विभागा अंतर्गत राज्यातील जनतेमध्ये कायद्याविषयी साक्षरता वाढवणे, नागरिकांचे हक्क व अधिकार जोपासणे, लोकशाही, निधर्मवाद मानवी अधिकार, कायद्याची अंमलबजावणी करणे आदी कार्य केले जाते. हे सर्व अधिकार व कार्यें जिल्हातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मी अध्यक्ष या नात्याने प्रयत्न करेन व आमचे नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने काँग्रेस पक्षाचा कायदा विभाग जिल्हाभर कार्यरत राहील. या विभागाची लवकरच कार्यकारणी तयार करून जाहीर करण्यात येईल जेणेकरून हा विभाग मजबुतीला व याचे कार्य जनतेपर्यंत पोहचण्यास मदत होईल.