Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeताज्याइंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे आज ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार

इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे आज ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार

इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे आज ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर तर्फे दरवर्षी मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार आयोजित केला जातो.याही वर्षी येत्या ८ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे दुपारी ४ वाजता हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गणेश नायकुडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष के. डी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी सौ. अमृता देवेंद्र फडणवीस तर म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत. तसेच लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. मंजू लोढा जिल्हाधिकारी अमोल येडगे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ७ मुख्याध्यापक १८ माध्यमिक व प्राथमिक शिक्षक प्राचार्य ५ कला व क्रीडा शिक्षक ११ पूर्व प्राथमिक शिक्षक यांचा सत्कार सोहळा होणार आहे.मुख्याध्यापक मध्ये शकुंतला कृष्णा पाटील, लक्ष्मी गणेश, स्वप्नील संदीप पाटील, भाग्यश्री सुरज मगदूम, रूपा राजेश पाष्टे, निले रीमा महेश, राजश्री युवराज पाटील आदींचा समावेश आहे.
तर शिक्षकांमध्ये कृपाल रामचंद्र यादव, सविता भीमराव काटकर, सुगंधा कपिल माळकरी, आरती राकेश दुर्गुळे, मीना प्रताप डाके, मधुरा मकरंद देशपांडे, अश्विनी प्रशांत सादळे, स्नेहलता जनगोंडा घाट, सुप्रिया प्रकाश किरवेकर, अनुराधा सुधीर कुकडे, सुमय्या इरफान बागवान, अश्विनी रामचंद्र पाटील, वर्षा. पी. कोतेकर, अपर्णा दिलीप मुंगार्डेकर, माहेश्वरी बाबासो पाटील, नेहा उल्हास खानाज, आशाराणी बबनराव भंडारी, सुभाष जयराम कांबळे, रूपाली संजय पाटील, मेघा विष्णू पाटील अरिफा सुलेमान फरास गौसिया साजिद नवाब,धनश्री अरविंद जाधव, प्रियांका सागर गुरव, तृप्ती विजय गोंधळी, मंजू संजय जालिंदरे, विशाखा अनिल खाडे, अबोली सागर देशपांडे, मनाली अनुप गणपते, राजाराम भाऊ पाटील, पद्मजा विकास भोसले,किशोर बाळासाहेब मानकापुरे, रियाज अब्दुल शेख, ज्ञानेश्वरी अमितकुमार स्वामी आदी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.
सोहळ्याचे यावर्षीचे हे चौथे वर्ष असून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांचे शैक्षणिक कार्य समाजातील योगदान व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन कोल्हापूरचे शहराध्यक्ष अमर सरनाईक सचिव सेक्रेटरी नितीन पाटील मुख्य समन्वयक सुहेल बाणदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments