इंजिनीअर्स डे निमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरच्या वतीने वाढतं कोल्हापूर बांधकाम क्षेत्र महारेरा शिवाय विकास अपूर्ण कार्यक्रमाचे आज आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : इंजिनीअर्स डे निमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरच्या वतीने वाढतं कोल्हापूर बांधकाम क्षेत्र महारेरा शिवाय विकास अपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन उद्या सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रेसिडेन्सी क्लब येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर यावेळी आमदार अमल महाडिक, बिल्डर्स असोसिएशन इंडिया हाउसिंग रेरा कमिटीच्या चेअरमन ज्योती चौगुले यांची उपस्थिती असणार आहे.यावेळी त्या बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये निवृत्त प्रधान सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य मा. श्री एकनाथ पाटील, निवृत्त मुख्य अभियंता श्री एस. एल. पाटील, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, एस.आर. पाटील,श्री. डी. डी. शिंदे,श्री. अशोक पवार,सौ. स्मिता माने, निवृत्त कार्यकारी अभियंता श्री. जी. के. शिंदे, श्री अण्णासो माळी, श्री रवींद्र. कागलकर, श्री डी. वाय. कदम, श्री. शिवाजीराव चव्हाण, श्री. बारदेशकर, श्री. व्ही. एस.पाटील, कार्यकारी अभियंता जलसंधारण श्री. स्वप्नील पाटील, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद कोल्हापूर श्री. मानसिंग पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व बांधकाम व्यवसायिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर इंडिया कोल्हापूर सेंटरचे चेअरमन श्री. विजय कोंडेकर, सेक्रेटरी उमेश शेठ, ट्रेझरर रणजीत पाटील यांनी केले आहे.