माधुरी साठी नांदणीकरांची पायपीट आमची माधुरी हत्ती आम्हाला परत द्या नांदणीकरांची हाक
नांदणीकरांनी काढली नांदणी मधून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतव पदयात्रा,दिला दयेचा अर्ज
कोल्हापूर/ प्रतिनिधी : गेली ३५ बीबीवर्षापासून नांदणीतील जैन मठांमध्ये राहत असलेली माधुरी ही हत्ती अंबानी यांच्या गुजरात येथील वनतारा येथे नेण्यात आली आहे. साश्रूपूर्ण नैनांनी या माधुरीला नांदणीकरांनी निरोप दिला होता नांदणीकरांनी आपल्या जीवावर दगड ठेवून तिला सुप्रीम कोर्टाचा आदेश मानत वनताराकडे सोपविले होते मात्र या माधुरीसाठी नांदणीकरांची एक नाळ जोडली गेली होती ही नांदणीकरांची शान होती. गेली ३५ वर्षे ती नांदणीमध्ये वास्तव्य करत होती. तिला वनताराकडे सुपूर्द करत असताना नांदणीकरांना गहिवरून आले होते आज त्याचाच उद्रेक झाला आणि कोल्हापुर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमची माधुरी आम्हाला परत करा असे म्हणत नांदणी ते कोल्हापूर अशी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून नांदणीकरांनी एकीचे बळ हे दाखवून दिले. यावेळी आमची माधुरी आम्हाला परत करा या मागणीचा दयेचा अर्ज राष्ट्रपती यांच्या नावे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना नांदणीकरांनी सादर केला. आज नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा काढत नांदणीकरांनी तिने साठी माधुरीसाठी पाई चालत आपली आर्त हाक दयेच्या अर्जाद्वारे सादर केला.
महाराष्ट्र व कर्नाटकातील आराध्य दैवत असलेल्या जिनसेन मठ नांदणी ता. शिरोळ येथील मठाची माधुरी उर्फ महादेवी ही हत्ती परत मिळणेबाबत ही पदयात्रा काढण्यात आली.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ७४३ गावांच्या जिनसेन मठ नांदणी यांच्या माधुरी हत्तीला पेटा व अंबानीच्या वनतारा यांनी व्यवस्थेला बटीक करून चुकीच्या पध्दतीने बेकायदेशीर रित्या हा हत्ती अंबानींच्या वनतारा याठिकाणी पाठविण्यात आलेला आहे.
गेल्या जवळपास ४५० वर्षापासून या मठाच्या माध्यमातून हत्ती पाळले जात आहे.
सांस्कृतीक, धार्मिक व ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तीचे गेली ३३ वर्षे या मठामध्ये संगोपन व पालनपोषण केले गेले आहे. माधुरी उर्फ महादेवी हि हत्ती त्याच्या स्वभावामुळे सर्वसामान्य जनतेची, तरूण -तरूणींची, मुला – मुलींची, ज्येष्ठ लोकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. दैनंदिन मठाशेजारील गावामध्ये फेरफटका असायचा.
माधुरी उर्फ महादेवी हत्ती घेऊन जात असताना शासनाकडून तसेच वैद्यकीय अधिकारी यांचेकडून दिलेले त्याच्या पालनपोषणाचे तसेच वैद्यकीय अहवाल हे सकारात्मक होते. पेटाने व वनताराने या हत्तीच्या अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. जर माधुरी ही हत्ती आजारी होती तर सलग ४८ तास प्रवास करून ती वनतारा जामनगर येथे कोणत्या नियमान्वये घेऊन गेले.
आमची लाडकी माधुरी हत्तीला बोलता येत नाही अन्यथा तिने स्वतःहूनच आपल्या भावना आपल्यासमोर व्यक्त करून त्या भावनांचा विचार करून आपण त्याला वनतारा मधून मुक्त केल असत. गेली ३३ वर्षे माधुरी हत्ती माणसाळेलेली आहे.तिला लहान मुलापासून ते अबालवृध्दा पर्यंत सर्वांचा लळा लागला आहे. वनतारा याठिकाणी घेऊन जाण्याआधी गावातून काढलेल्या मिरवणुकीत तिच्या डोळ्यातून अश्रू ढळत होते.
गेल्या चार दिवसापासून या घटनेमुळे दक्षिण भारतातील लोकांच्या जनभावना आक्रमक झाल्या असून तीव्र रोष निर्माण झाला आहे. तरी आपणांस समस्त ग्रामस्थांच्यावतीने आदरपूर्वक निवेदन करतो कि ज्या पध्दतीने काम एखाद्या अपराध्यास सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली गेली असेल तर ती रद्द करण्याचे अधिकार आपणांस आहेत. याच सर्वोच्च अधिकाराचा वापर करून आपण आमच्या लाडक्या माधुरी हत्तीस नांदणी मठाकडे सुखरूप स्वाधीन करावे अशी विनंती समस्त नांदणी कर कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तीप्रेमी यांनी केली आहे.
आज या पदयात्रेचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले यावेळी या पदयात्रेमध्ये आमदार विश्वजीत कदम,आमदार राहुल आवाडे ,माजी आमदार प्रकाश आवडे,खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने माजी आमदार उल्हास पाटील रजनीताई मगदूम यांनी नेतृत्व केले.
या पदयात्रेदरम्यान पदयात्रा मार्गावर नांदणीकरांसाठी हत्तीप्रेमींसाठी ठिकठिकाणी पाणी फळे यांचे वाटप केले गेले जवळजवळ बारा तास चाललेल्या या पदयात्रेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा मार्गावर संपूर्ण अति प्रेमींची काळजी घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हत्ती प्रेमीनी एकवटून गेला होता. आमची हत्ती आम्हाला परत करा अशा मागणीचे फलक यावेळी हत्ती प्रेमींनी हातामध्ये घेतले होते. या पदयात्रेमध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता शिवाय सोन्याचा हत्ती ही पदयात्रेमध्ये सहभागी करण्यात आला होता.