Thursday, October 23, 2025
spot_img
Homeताज्यावंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद १२ आणि १३ जुलैला कोल्हापूरमध्ये – ISAR महाराष्ट्र...

वंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद १२ आणि १३ जुलैला कोल्हापूरमध्ये – ISAR महाराष्ट्र शाखा (MSR)आणि KOGS चा संयुक्त उपक्रम

वंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद १२ आणि १३ जुलैला कोल्हापूरमध्ये – ISAR महाराष्ट्र शाखा (MSR)आणि KOGS चा संयुक्त उपक्रम

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून, यावर योग्य निदान व उपचाराची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) – महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनेकॉलॉजी सोसायटी (KOGS) यांच्या सहभागाने १२ व १३ जुलै २०२५ रोजी वंध्यत्व विषयक दोन दिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती डॉ.पद्मारेखा जिरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी डॉ.शिशिर जिरगे उपस्थित होते.या परिषदेचे उद्घाटन १२ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के शिवाजी यांच्या हस्ते होणार आहे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किरण कुर्तकोटी असतील.
या परिषदेमध्ये स्त्री व पुरुष वंध्यत्व, हार्मोनल असंतुलन, आधुनिक उपचारपद्धती (IVF, IUI), जनुकीय चाचण्या, आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे.राज्यभरातील आणि देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, Embryologist युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. नवोदित डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही परिषद एक मौल्यवान शैक्षणिक संधी ठरणार आहे.
महाराष्ट्र ISAR शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मारेखा जिरगे व KOGSच्या अध्यक्षा डॉ. मनीषी नागवकर यांनी सांगितले की, “या परिषदेमुळे कोल्हापूरमधील स्त्रीरोगतज्ज्ञांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे.या परिषदेत KOGS चा सक्रिय सहभाग असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये या विषयाबाबत एकसंध जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या कार्यक्रमात डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. अमित पतकी, डॉ. केदार गणला सचिव, एमएसआर, आणि डॉ. तानाजी पाटील सहआयोजक सचिव, केओजीएस, तसेच डॉ. रणजित किल्लेदार सचिव, केओजीएस , डॉ. साधना पटवर्धन, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सतीश पतकी, डॉ. मिलिंद पिशवीकर, आणि डॉ. प्रविण हेन्द्रे हे सर्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.ही परिषद कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments