बेकरी व्यवसायात चकोते ग्रुपचे जागतिक बाजारपेठेत पदार्पण,
उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची जागतिक पातळीवर झेप
उद्योजक आण्णासाहेब चकोते यांच्या यशस्वीपणे वाटचालीत त्यांच्या गणेश बेकरीचा लौकिक नांदणी ते न्युयॉर्कपर्यंत
एक यशस्वी उद्योजक कसा असावा याची ओळख द्यायची झाली तर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील रहिवाशी असलेले उद्योजक आण्णासाहेब चकोते यांचे द्यावे लागेल.कारण त्यांनी अगदी शून्यातून आपला प्रवास करून यशस्वी वाटचाल ही आपल्या गणेश बेकरी चकोते ग्रुपच्या माध्यमातून केली आहे.आज या गणेश बेकरी च्या माध्यमातून त्यांचा लौकिक हा
नांदणी ते न्युयॉर्कपर्यंत पोहोचला आहे.१० *१० च्या खोलीतून सायकलवरून सुरू झालेल्या लघु उद्योगाला आंतरराष्ट्रीय ब्रँड श्री. अण्णासाहेब चकोते यांची कार्यतपस्वी, उद्योगमेरू, बेकरी किंग अशी वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. पारंपारिक उद्योगाचा विकास आणि त्याचे औद्योगी करणाचे याबाबतचे नवीन उच्चांक त्यांनी स्थापित केलेले आहेत. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचून सुद्धा मातीचा ध्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब चकोते…
अण्णासाहेब चकोते यांच्याकडे पैसा व अनुभव नव्हता, होती ती फक्त जिद्द, स्वतःवरचा व व्यवसायाच्या भविष्यावरचा असणारा विश्वास. कष्ट घेण्याची तयारी, निपक्षपातीपणा, चिकाटी, पारदर्शकता, उत्कृष्टतेचा ध्यास, अविरतसेवा, गुणवत्तेवरचा विश्वास, बदलाची तयारी या मूल्यांचा भक्कम पायावरच चकोते कार्य करत आले आहेत. मूल्यांमध्ये तडजोड न करता, कोणती नियम न वाकवता, नैतिकतेने व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेता येते हे अण्णासाहेबांनी दाखवून दिले आहे. हे यश टिकून राहण्यासाठी व्यवसायात सर्वच बाबतीत उच्च गुणवत्ता राखणे व अविरत सेवा देणे हे महत्त्वाचे हे ते ओळखून आहेत. म्हणूनच काटेकोरपणे अद्यावत प्रक्रियेद्वारे आपल्या उत्पादनाचे वेगळेपण, तोच पारंपारिक बेकरी आरोमा व कोल्हापुरी चव यांच्या माध्यमातून वेगळेपण त्यांनी जपले आहे.
आपण तयार केलेला प्रॉडक्ट ग्राहकांना पसंतीस उतरला पाहिजे यासाठी आण्णासाहेब चकोते यांचा आतील जातीवंत हाडाचा बेकर नेहमीच कार्यरत असतो, पदार्थांच्या मूळ रंग, पोत, माऊथ फिलिंग मध्ये तडजोड कधीच मान्य करत नाहीत त्यामुळे त्यासाठी लागणारे उच्चप्रतीचे FSSAI नियमांचे पालन करून फुड स्टॅंडर्ड प्रमाणेच रॉ मटेरियल ची चोखंदळ निवड केली जाते तसेच त्याची प्रोसेस यावर परीक्षण करून नियंत्रण केले जाते. ग्राहकांची आवड निवड लक्षात घेऊन प्रॉडक्ट बनवण्याच्या कलेत आण्णासाहेब चकोते हे पारंगत आहेत. एखाद्या सुगरणी प्रमाणे आपल्या प्रत्येक प्रॉडक्ट उत्तमच असला पाहिजे यासाठी ते आग्रही असतात त्यांची हीच आवड त्यांना त्यांच्या व्यवसायात यशस्वी बनवते. नवीन प्रकल्पामध्ये प्रॉडक्ट व मशिनरीचा मेळ घालत बेकरीचा खराखुरा अरोमा जो काळाच्या ओघात प्रिझर्व्हेटिव्हज् च्या अतिरिक्त वापरामुळे लुप्त होत आहे, तोच पारंपारिक भट्टीतून भाजलेल्या प्रॉडक्टचा अरोमा नवीन प्रगत टेक्नॉलॉजीद्वारे देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असणारी पारंपरिक कोल्हापुरी शाही खाद्य संस्कृतीला जपणारी नमकीन उत्पादन देखील आपली ओळख निर्माण करतील या विश्वास आण्णासाहेब चकोते यांना आहे.
बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कंपनीने लवचिक असणं ही अत्यावश्यक गरज त्यांनी ओळखलेली होती बदलत्या घडामोडींवर लक्ष देत पण सातत्याने त्यांनी आपल्या कंपनीला कॉर्पोरेटच्या या स्पर्धेत पुढे आणले क्षितिज खूप लांब आहे पण आपण नक्की तिथे पोहोचू शकतो हे त्यांना चांगलंच माहिती होतं परिपूर्णता हा मूळ स्वभाव असणाऱ्या चकोते यांनी झटपट पैसा मिळवण्यासाठी शॉर्टकट न घेता बाजारपेठेचे भान ठेवून भारतीय चवीला असणारी मागणी व त्यासाठी लागणारी जागतिक दर्जाची टेक्नॉलॉजी संपूर्ण स्वयंचलित उत्पादन सुविधा स्वच्छता आणि सुरक्षेची मानांकने आवश्यक हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर तसेच अधिक उत्पादन क्षमतेच्या नवीन प्रकल्पाला त्यांनी पूर्णत्वास नेले.
या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ब्रेड विभाग १,००,००० लोप्स, टोस्ट १८ टन, केक ५,७५,००० नग, बटर-बन ५,००,००० नग आणि नमकीन विभागांमध्ये पोटॅटो चिप्स १० टन, कुरकुरे व फ्राईम्स १० टन, मूग डाळ १० टन, भडंग १० टन, चिवडा व फरसाण ४० टन अशी संपूर्ण मिळून १५० टन प्रति दिन झाली आहे. या क्षमतेचा हा प्रकल्प १३ एकर जागेत २.५० लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे. जागतिक दर्जाचे या प्रकल्प मध्ये ISO २२००० व HACCP ची तशीच USFDA , हलाल यासारख्या मानकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सविस्तर नियोजन आणि त्याची अंमलबजावणी विविध स्तरावरील चाचण्या आणि क्वॉलिटी कंट्रोल चा पुरवठा,पाठपुरवठा आणि विश्लेषण इत्यादीचा समावेश असतो गुणवत्ता आणि उत्पादकता यासंबंधी कंपनी कडून ग्राहकांच्या असणाऱ्या अपेक्षा, रुपरेषा यांची एक नियमावली तयार करण्यात येते व त्याचा पाठपुरावा केला जातो. यामुळे सर्वोत्तम गुणवत्ता प्रणालीची अंमलबजावणी होते. या प्रकल्पातील स्वच्छता, सुरक्षा, प्रक्रिया व व्यवसाय व्यवस्थापन प्रणालीची उत्तम आणि विश्वासार्ह प्रक्रिया पाहण्यासाठी सर्वांसाठी व्हिजिटर गॅलरी देखील लवकरच सुरू होत आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करत आहे .महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश मधील अगदी खेडोपाड्यात जिथे अजूनही एसटी देखील जात नाही अशा वाड्या वस्त्यांवर देखील चकोतेंचे प्रोडक्ट पोहोचले आहेत. यातूनच वितरक व रिटेलर विक्रेते यांचे एक भावनिक जाळे सुद्धा तयार झाले आहे. स्वतः व्यवसायाचे धडे गिरवत असताना आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांना देखील व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आणि खऱ्या अर्थाने चकोते यांनी वितरण व्यवस्थेचे जाळे निर्माण केले. देशात प्रथमच बेकरी साठी वितरण व्यवस्था ही गणेश बेकरीतूनच चालू झाली आणि आता बेकरी सोबतच नमकीन या विभागासाठी सुद्धा स्वतंत्र वितरण व्यवस्था सुरू झालेली आहे. साधारण पणे ५०० पेक्षा जास्त वितरक ही उत्पादने लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तत्पर असतात. तसेच कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड,युके,नाॅर्वे, सिंगापूर, दुबई, आयर्लंड या ठिकाणी सुद्धां चकोते प्राॅडकटसनी स्थान मिळविले आहे.
स्वतःचे कुटुंब असो, त्यांचीच निर्मिती असणारे गणेश बेकरी कुटुंब असो किंवा समाज असो प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी, अनेकांच्या हितासाठी अनेकांच्या आनंदासाठी अनेकांच्या सुखासाठी कुटुंबप्रमुख म्हणून अण्णासाहेब स्वतः मनापासून झटताना दिसतात. आपल्यासारख्या तरुण-तरुणींनी झपाट्याने पुढे सरकावं परिस्थितीच्या रेट्यात न अडकता पुन्हा नव्याने उभे राहून स्वतःची सक्सेस स्टोरी निर्माण करावी अशी त्यांची मनापासून इच्छा असते. बदलत्या वेळेच्या कसोटीवर टिकून राहील अशी टीम तयार करण्यावरती त्यांचे लक्ष नेहमीच असते. संस्थेचे ध्येय आणि तिची कामाची शैली हा त्या संस्थेचा आत्मा असतो असे चकोते मानतात.आण्णासाहेब चकोते उद्योगशीलते बरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील संवेदनशीलतेने कार्य करताना दिसतात कोरोना काळात विशेषतः चकोते ग्रुपच्या माध्यमातून एका दिवसात २०२५ रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सलग दोन वर्ष ३५० बसस्थानके एकाच दिवशी एकावेळी स्वच्छ करून रंगकाम करण्यात आली आणि याचीच नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा झाली आहे.
केवळ विक्री, नफा, वितरण प्रणाली यावर, आघाडीवर न राहता ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार उत्पादनांचा दर्जा, पॅकेजिंग,न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, पॅकेजिंग, किंमत, जाहिराती, नवीन वितरणाच्या कल्पना यामध्ये आण्णासाहेब बदल करत आहे. हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून ऑनबोर्ड केले. ब्रँड अँबेसिडर असणारी चकोते ही भारतातील पहिली ब्रेड कंपनी ठरली. अण्णासाहेब चकोते यांनी अशा प्रकारे पारंपारीक बेकरी व्यवसायाला आधुनिकीरण व औद्योगीकरणाचे स्वरूप दिले. भविष्यातील नवे उद्योजक तसेच अनेक पारंपरिक उद्योजकांना, आंत्रप्रिनीअर्सना हा प्रकल्प आण्णासाहेब चकोते यांची चिकाटी, कष्ट, अभ्यासुवृत्ती, सातत्य व नव्या संकल्पनाचा अवलंब या गोष्टी नक्कीच आदर्शवत ठरतील.क्रीडा, चित्रपट, कला, संस्कृती, बदलती जीवनशैली याबाबत सतर्क लक्ष ठेवत काळाचे थोडे पुढे जाऊन चौफेर विचारांमुळे आण्णासाहेब भविष्याची नेमकी चाहूल घेतात. कोणतीही गोष्ट राहून गेली म्हणून तुटपुटत न बसता प्रत्येक क्षण शिकत जगणं हाच अण्णासाहेबांचा खरा स्वभाव त्यासाठी कोणत्याही मर्यादेचे कुंपण न ठेवता सगळ्या चौकटी मोडून काढत जे हवं ते शिकायचं आणि जे आवडेल ते मनापासून जीव ओतून करायचं म्हणजेच त्यांच्याच भाषेत जगायचं आणि हे जगण्याचं गुपित त्यांना गवसलय. जी माणसं सज्ज असतात त्यांनाच संधीचा फायदा घेता येतो म्हणूनच त्यांना यश मिळत असतं, नशिबावर नाही तर परिश्रमावर विश्वास ठेवावा, या गोष्टींवर विश्वास ठेवणारे आशावादी, जीवन प्रवासी म्हणजे आण्णासाहेब….
सुप्रिया डांगे.
गणेश बेकरी
नांदणी.