कोल्हापूरमध्ये मराठी चेवर ऑफ कॉमर्स संस्थेच्या वतीने गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शनास प्रारंभ
२४ मार्च पर्यंत महाराष्ट्र व्यापारी पेठचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र व्यापारी पेठ हे गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र व्यापारी पेठ २०२५ आयोजित गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आजपासून व्ही.टी.पाटील सभागृह येथे सुरू झाले आहे.आज या प्रदर्शनाचे उद्घाटन मार्व्हलस इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर श्री संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष श्री.मनोहर पेडणेकर, कोल्हापूर शाखा अध्यक्ष श्री.राजन चौगुले, उपाध्यक्ष मोहन वाइंगडे, विदर्भ हेड शरद की, अलिबाग हेड विजय राणे,कोल्हापूर शाखा सचिव श्री बाबा खोडवे आदी उपस्थित होते.
मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ ही संस्था गेली ४५ बर्ष मराठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या उत्कर्षासाठी निस्वार्य बुद्धीने अहोरात्र कार्य करत आहे.
‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’ हा आमचा मराठी उद्योजक, लघु उद्योजकांसाठी विशेषतः महिला उद्योजकांसाठीचा एक विशेष उपक्रम आहे.’महाराष्ट्र व्यापारी पेठ’ द्वारे उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिलं गेलं आहे.कोल्हापुरात पहिल्यांदाच दिनांक २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये सदर ‘महाराष्ट्र व्यापारी पेठचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील विविध वस्तूचा समावेश स्टॉलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. यामध्ये कोल्हापुरी गुळ, काकवी, साडी ड्रेस मटेरियल, तर अत्तर अन्य खाद्यपदार्थ,अन्य वस्तू यांची विक्री या ठिकाणी केली जाणार आहे.
१९८९ सालापासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’चं आयोजन मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. गेली ३५ वर्ष मुंबईमधील दादरच्या डिसिल्वा हायस्कूलमध्ये सलग ६८ दिवसांची व्यापारी पेठ आयोजित केली जात आहे.
यावर्षी कोल्हापूर मध्ये याचे आयोजन करण्यात आले असून २०२५ मध्ये राज्याच्या विविध महानगरांमध्ये, शहरांमध्ये आम्ही ‘महाराष्ट्र आापारी पेठचं आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोल्हापूर मध्ये २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये ही व्यापार पेठ होत आहे.याद्वारे कोल्हापूर मधील लघुउद्योजक, महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या हा संस्थेचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले असून दररोज सकाळी ११:०० ते रात्री ८:३० ही प्रदर्शन सुरू राहणार असून याचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.