Thursday, April 24, 2025
spot_img
Homeग्लोबलसरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अंतर्गत, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर यांचेकडून ग्रामपंचायत सरनोबतवाडी येथे २४ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या शिबिराचा उद्देश स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि आरोग्य जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबविणे होता. शिबिरामध्ये स्वच्छता मोहिम, आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्य जागरूकता रॅली, आरोग्य जागरूकतेसाठी घरं भेट असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे कार्यक्रम अधिकारी श्री. उद्धव आतकीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना सदस्य प्रा. किमाया जोशी, प्रा. प्रतीक्षा पाटील, प्रा. साक्षी माने यांनी देखील शिबिरात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या शिबिराने ग्रामीण भागात आरोग्य आणि स्वच्छतेसाठी मोठे योगदान दिले आहे आणि स्थानिक समाजातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे.
या शिबिरासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी यांचे सहकार्य लाभले आणि संस्थेच्या सेक्रेटरी मा. शोभा तावडे यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिलकुमार कुलकर्णी व प्राचार्य डॉ. राजकुमार बगली यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments