Thursday, April 24, 2025
spot_img
Homeताज्याउद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक...

उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

नांदणी (ता. शिरोळ)/प्रतिनिधी : येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरी नांदणीचे संस्थापक, उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सोमवार दि. २४ मार्च रोजी विविध सामजिक उपक्रमाने साजरा करणेत येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गतिमंद मुलांना दत्तक घेणे यासह विविध सामजिक उपक्रम राबविणेत येणार आहेत
चकोते ग्रुपच्या माध्यमातून उद्योगपती
आण्णासाहेब चकोते यांनी प्रयत्नांची शिकस्त, नाविन्याचा ध्यास, दुरदृष्टी या त्रिसुत्रीच्या बळावर उद्योग, कृषी व शैक्षणीक क्षेत्रात चकोते ग्रुपने भरारी घेतली आहे.देशभरातील अन्न प्रक्रिया उद्योगात एक अभ्यासू व्यक्तीमत्त्व म्हणूण त्यांनी आपली छाप सोडली आहे.बेकरी उद्योगातले मार्गदर्शक अशी प्रातिमा त्यांनी देशभरात निर्माण केली आहे. म्हणूणच त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेवून ऑल इंडीया ब्रेड मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनच्या सिनियर व्हा. प्रेसिडेंट म्हणूण नुकतेच दिल्ली येथे सलग आठव्यांदा त्यांची निवड करणेत आली आहे.
उद्योग विश्वातील या उतुंग भरारी बरोबरच वाढदिवस हा एक निमीत्त ठेवून सामाजिक कार्याला बळ देऊन प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम जसे एकाच दिवशी ३५० बसस्थानकांची स्वच्छता व रंगकाम करून स्वच्छ भारत अभियान यशस्वी करून दाखविले आहे.म्हणूनच याची दखल घेवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्दे नोंद करण्यात आली आहे.
त्याच बरोबर गेली पंधरा वर्षे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात आहे.कोरोना महामारीत काळाची गरज ओळखून आण्णासाहेब चकोते यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते त्यांच्या हाकेला प्रतिसाद देवून या महारक्तदान शिबीरात तब्बल २०२५ लोकांनी स्वंयफुरतींने रक्तदान केले होते.याच बरोबर गतीमंद मुलांना दत्तक घेणे, वृद्धाश्रमांना मदत करणे, महापुर काळात पुरग्रस्तांना मदतकार्य करून त्यांना जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, दृष्काळग्रस्त गावे दत्तक घेवून त्या ठिकाणी चारा व पाण्याची व्यवस्था करून एक विधायक पाऊल उचलले आहे. शिवाय आरोग्य शिबीर व वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रम समाज उपयोगी ठरत आहेत. तर शैक्षणीक व वैचारिक प्रगतीसाठी नांदणीचे नवजीवन नगर वाचनालय व एबीसी स्कुलची निर्मीती करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
वाढदिवसानिमीत्त नांदणी येथे नांदणी भाजीपाला संघ (जयसिंगपूर रोड) नवजीवन नगर वाचनालय व महादेव मंदीर,गावभाग नांदणी येथे रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे. सकाळी विविध ठिकाणी वृक्षारोपण अभियान आदी उपक्रम राबविणेत येणार आहेत. तसेच चकोते उद्योग समुहातील सर्व कामगारांच्या उपस्थितीत उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा केक कापून वाढदिवस साजरा करणेत येणार आहे. त्यावेळी गतीमंद मुलांना दत्तक घेण्याचा उपक्रम होणार आहे. दिवसभर गणेश बेकरी नांदणी (ओल्ड प्लॅन्ट) येथे सर्वाच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी श्री चकोते उपस्थित असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments