ताराराणी प्राधान्य कार्ड धारकांना रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्य देण्याचा बोर्ड लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेंतर्गत बँकेत/ कार्यालयात येणाऱ्या एक किंवा दोन मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या ताराराणी प्राधान्य कार्ड धारक ग्राहकांना कोणत्याही रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्य देवून सेवा दिली जाईल, याची नोंद घ्यावी, असा बोर्ड आपल्या कार्यालयात व बँकेत लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी व सन्मान देण्यासाठी ही नाविन्यपूर्ण योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत मागील पाच वर्षातील एक व दोन मुलींनंतर कुटूंब शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना व मुलींना सन्मानीत करण्यासाठी प्राधान्य कार्ड देण्यात आले असून त्यांना रांगेमध्ये न थांबवता त्यांना प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.