लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान करण्यास चुरशीने सुरुवात
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४७ कोल्हापूर आणि ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान सुरू झाले आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत कोल्हापूर मतदार संघातील चंदगड २७१ मध्ये ५.६० % कागल २७३ मध्ये ८.९८ % मतदान झाले आहे.तर करवीर २७५ मध्ये ११.७१% कोल्हापूर उत्तर २७६ मध्ये ९.६८% कोल्हापूर दक्षिण २७४ मध्ये ९.०६ % आणि राधानगरी २७२ मध्ये ३.५० % मतदान झालेले आहे.
हातकलंगले ४८ मतदारसंघात हातकलंगे 278 या ठिकाणी 8.50 इचलकरंजी 279 या ठिकाणी 791 इस्लामपूर 283 7.76 शाहुवाडी 2007 या ठिकाणी 6.21 शिरोली 284 या ठिकाणी 6.7 आणि शिरोळ 280 मध्ये 5.20% मतदान झालेले आहे.
अत्यंत चुरशीने झालेल्या प्रचारानंतर आता चुरशीने मतदान होत असल्याचे दिसून येत आहे.मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा मतदारांच्या लागल्या असून काही ठिकाणी संथ गतीने कामकाज चालू असल्याचे पहावयास मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर मतदार यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आहे.
जिल्ह्यात 47 कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 23.77 टक्के मतदान झाले आहे.
चंदगड- 271- 20.56 टक्के
कागल- 273- 23.18 टक्के
करवीर -275- 31.95 टक्के
कोल्हापूर उत्तर 276- 23.24 टक्के
कोल्हापूर दक्षिण 274- 22.55 टक्के
राधानगरी- 272- 21.49 टक्के
जिल्ह्यात 48 हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 20.74 टक्के मतदान झाले आहे.
हातकणंगले- 278 – 24.12 टक्के
इचलकरंजी 279 – 20.26 टक्के
इस्लामपूर- 283- 21.70 टक्के
शाहूवाडी- 277- 17.16 टक्के
शिराळा- 284- 19.76 टक्के
शिरोळ – 280- 21.10 टक्के