१०२ वर्षाचे आजोबा बाबासो राजाराम यादव यांनी शिरोलीत केले मतदान
शिरोली/प्रतिनिधी : आज सात मे रोजी मतदाना कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे वृद्ध लोकांसाठी घरोघरी मतदान करून घेण्याची केली आहे तरीही मतदान करणे हे माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे म्हणत आज शिरोली येथील १०२ वर्षाचे बाबासो राजाराम यादव यांनी जिल्हा परिषदेची शाळा ज्ञानदीप विद्यालय शिरोली येथे आपल्या मतदानाचा बजावला.मतदानाची प्रक्रिया ही इतक्या चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे की वृद्ध व्यक्तींना त्रास होऊ नये यासाठी शासनाने घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले आहे. पण तरीही मी मतदान करणे हे माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेतून मतदान केंद्रावर येऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे अशी प्रतिक्रिया बाबासो यादव यांनी माय मराठी न्यूजशी बोलताना दिली आहे.